Wednesday, 17 June 2020

"भाजपातर्फे रिक्षा चालकाना मोफत धान्य आणि हॅन्ड सनिटायजरचे वाटप"

"भाजपातर्फे रिक्षा चालकाना मोफत धान्य आणि हॅन्ड सनिटायजरचे वाटप"

         
प्रतिनिधी: अरूण ठोंबरे
बदलापूर येथील एरंजाड वार्ड क्र.३चे ठाणे जिल्हा भा.ज.पा.पक्षाचे   खजिनदार शंकर गजानन भोईर यांच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून हाताला काम नसल्याने मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करणारे कामगार, रिक्षा चालक यांची उपासमार होत आहे.लक्षात घेऊन ठाणे जिल्हा भा.ज.पा खजिनदार शंकर गजानन भोईर यानी बदलापूर मधील एरंजाड वार्ड क्र.३ मध्ये रिक्षा चालकाना मोफत धान्य आणि हॅन्ड सनिटायजरचे वाटप केले. रिक्षा चालकानी त्यांचे आभार मानले.यावेळी ठाणे जिल्हा भा.ज.पा. खजिनदार शंकर गजानन भोईर,समाजसेवक मनोहर हरिचंद्र मेहर, भा.ज.पा.युवा मोर्चाचे उपाध्यक्ष देवेंद्र मेहर तसेच  भा.ज.पा.चे इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...