Wednesday, 17 June 2020

"पत्नी प्रियकरासोबत निघून गेल्याने रिक्षा चालकाने केली आत्महत्या"

"पत्नी प्रियकरासोबत निघून गेल्याने रिक्षा चालकाने केली आत्महत्या"


नाशिक – ‘मी गेले चार दिवस खूप मानसिक तणावातून जात आहे. माझी पत्नी शनिवारी घरातून निघून गेली. मुंगसे येथील कल्पेश सूर्यवंशी हा आमिष दाखवून तिला घेऊन गेला आहे. त्यामुळे मी एवढे दिवस कमावलेली इज्जत पत्नी मातीत मिळवून निघून गेली आहे. तिने जाताना माझ्या चार वर्षाच्या मुलाचादेखील विचार केला नाही, असे पत्रात नमूद करत उमराणे (ता. देवळा) येथील एका पदवीधर रिक्षा चालकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आत्महत्या केलेला रिक्षा चालक मालवाहू रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. तो सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय होता. त्याची पत्नी पूजा काही दिवसांपूर्वी परिचित युवकाने फूस लावल्याने घर सोडून निघून गेली.

त्यामुळे गेले चार दिवस हा रिक्षा चालक अत्यंत खचला होता. या घटनेमुळे समाजात काय चर्चा होईल? लोक काय म्हणतील, या विचाराने तो घराबाहेर देखील पडला नव्हता. या तणावातच त्याने आज (बुधवारी) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली होती आणि ती चिठ्ठी फेसबुकवर शेअर केली आहे.

*चिठ्ठीत काय लिहिलं आहे ?*

मी गेले चार दिवस खूप मानसिक तणावातून जात आहे. माझी पत्नी शनिवारी घरातून निघून गेली. मुंगसे येथील कल्पेश सूर्यवंशी हा आमिष दाखवून तिला घेऊन गेला आहे.

त्यामुळे मी एवढे दिवस कमावलेली इज्जत पत्नी मातीत मिळवून निघून गेली आहे. तिने जाताना माझ्या चार वर्षाच्या मुलाचादेखील विचार केला नाही. त्यामुळे आता मला समाजात, नातेवाइकांत तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही.

हा जो काही प्रकार म्हणजे तू आणि तो कल्पेश मुन्ना पूर्वीच घरात सापडले होते. त्यातले मला काहीही माहीत नव्हते. हे जर मला माहीत असते, तर मी हे प्रेम कधीच होऊ दिले नसते. आता मी आत्महत्या करतो आहे.

त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त पत्नी आणि कल्पेश आहे. मला तिची गरज नाही, पण मला माझ्या इज्जतीची गरज आहे. पोलिस प्रशासनाला मला एवढेच सांगणे आहे, की त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी.

राहूलच्या आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व घटनेची चौकशी केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...