Wednesday, 17 June 2020

सूत्रसंचालक डॉ.निलेश साबळे यांचा नवीन कार्यक्रम 'लाव रे तो व्हिडीओ' !!

सूत्रसंचालक डॉ.निलेश साबळे यांचा नवीन कार्यक्रम 'लाव रे तो व्हिडीओ' !!


मुंबई - लॉकडाऊनचे अनलॉक होताना आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.मनोरंजनाची माध्यमे आता सुरु होणार आहेत. या कालावधीत लोक घरी बसून कंटाळले होते. त्यांचा कंटाळा दूर करुन त्यांना रिफ्रेश करण्यासाठी आता ‘झी युवा’वाहिनीवर लवकरच एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘लाव रे तो व्हिडिओ’ असे या कार्यक्रमाचे नाव असून या नव्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अँकर डॉ. नीलेश साबळे करणार आहे. महत्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना घरबसल्या या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

घरात बसून आपल्यातील कलागुण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून त्यांचे मनोरंजन करण्याची संधी असंख्य कलाकारांना मिळणार आहे.
‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम आपल्या सहजसुंदर आणि प्रसंगोचित सूत्रसंचालनाने ज्याने गाजवला तो नीलेश साबळे, आता ‘झी युवा’ वाहिनीवर सुद्धा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

महाराष्ट्राचे मनोरंजन करु शकेल, सगळ्यांना पोट धरुन हसायला लावेल, अशा टॅलेंटचा सध्या शोध सुरु आहे. पण या कार्यक्रमात आणखी एक खास सरप्राईज सुद्धा आहे. नीलेश साबळेसोबत आणखी एक सेलिब्रिटी प्रत्येक भागात सहभागी होणार आहे.

‘लाव रे तो व्हिडिओ’ या कार्यक्रमातून, महाराष्ट्रातील लोकांचे छुपे टॅलेंट जे आजवर केवळ मोबाईल किंवा इंटरनेटवर दिसत होते आता ते लाखो करोडो लोकांना टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.

‘लाव रे तो व्हिडिओ’ हे वाक्य मागील निवडणुकांच्या वेळी मनसे अध्यक्ष ‘राज ठाकरे यांच्यामुळे चांगलेच गाजले होते. त्याचाच आधार घेतलेला हा एक आगळावेगळा कार्यक्रम प्रेक्षकांचा स्पर्धक म्हणून थेट सहभाग असल्यामुळे रंगतदार होणार आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...