Wednesday, 17 June 2020

"पुरोगामी महाराष्ट्र पत्रकार संघ महाराष्ट्र चा यशवंत पवार यांना कोरोना योद्धा पुरस्कार"!!

"पुरोगामी महाराष्ट्र पत्रकार संघ महाराष्ट्र चा यशवंत पवार यांना कोरोना योद्धा पुरस्कार"!!


सोलापूर : जगात कोरोना महामारी ने थैमान घातले असून त्याचे पडसाद सोलापूर मध्ये फार मोठया प्रमाणात उमटले असून या रोगावर मात करण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोरोना ला पायबंद घालण्यासाठी जीवाचे रान करत आहे त्याबाबत संचार बंदी, जमाव बंदी, सारख्या जालीम उपाययोजना प्रशासन ला कराव्या लागल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत असताना
एक जागृत व जागल्या पत्रकार ची भूमिका यशवंत पवार यांनी पार पाडली असून नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवणे, सानिटायझर चा वापर करणे, वारंवार साबणाने हात धुणे, या सारख्या प्रशासन ने नागरिकांना दिलेल्या वेळोवेळी सूचना पत्रकार यशवंत पवार यांनी जनतेला आपल्या पत्रकारिता च्या माध्यमातून लेखन केल्या आहेत तसेच आपण सामाजिक भान ठेऊन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे याची दखल घेऊन "पत्रकार यशवंत पवार यांना पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र" या राज्यस्तरीय पत्रकार संघाने "कोरोना योद्धा पुरस्कार" दिला आहे 
याबत पत्रकार यशवंत पवार यांनी  या पुरस्कार बाबत पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांचे आभार मानले असून यापुढे ही आपण सजग पत्रकाराची भूमिका पार पाडून समाजाची सेवा करणार असल्याचे सांगितले असून "राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार" मिळाल्याने महाराष्ट्र मधील शेकडो पत्रकारांनी यशवंत पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...