Wednesday, 17 June 2020

कोरोना मुक्त मुरबाड तालुक्यात पुन्हा आढळले दोन रुग्ण !!

कोरोना मुक्त मुरबाड तालुक्यात पुन्हा आढळले  दोन रुग्ण  !! 


मुरबाड  ( मंगल डोंगरे ) 
कोरोनामुक्त मुरबाड तालुक्यात आढळले पुन्हा दोन रुग्ण, नागरिकांत पसरले भितीचे वातावरण. मात्र
मुरबाड शहरातील कोरोनाची लागण झालेल्या तीनही व्यक्ती उपचारा नंतर बऱ्या झाल्याने मुरबाड शहर कोरोना मुक्त झाले आहे. तसेच पिराची उंमरोली येथील दोनही व्यक्ती सुद्धा कोरोना मुक्त झाल्या आहेत. मुरबाड तालुक्यातील कोरोना लागण झालेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 08 असून त्यापैकी सहा जण बरे झाले आहेत. म्हाडस गावातील एका व्यक्ती वर मुंबई येथे उपचार सुरू असून आज  कोंडेसाखरे गावातील एका आजारी व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या दोन झाली आहे .तर क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 60 वर गेल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे यांनी दिली आहे.

   आता पर्यंत मुरबाड तालुक्यात बाहेरून येणारी वर्दळ रोखण्यात प्रशासना बरोबर नागरिक ही अपयशी ठरत असल्याने वारंवार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात यश येऊनही मुरबाड मध्ये असे रुग्ण आढळून येत असल्याने मुरबाड करांची चिंता वाढली आहे .

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...