कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी तसेच नगरसेवकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करा - भाजप गटनेत्याची मागणी
कल्याण अभिजित देशमुख : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती नगरसेवकांना देण्यासाठी तसेच या काळात नगरसेवकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करन्याची मागणी भाजप गटनेते शैलेश धात्रक यांनी महापालिका आयुक्तांसह महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे .
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना बाधिताच्या आकड्याने 2 हजारांचा टप्पा ओलांडला असून आजमितीला 60 बळी गेले आहेत .पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना सुरू असल्याचा दावा करण्यात आला असला तरी अनेकदा रुग्णवाहिकेअभावी ,उपचारा अभावी रुग्णांचे हाल झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत .रुग्णालयात देखील व्हेंटिलेटरची कमतरता,सोयी सुविधांचा अभाव आहे .त्यातच पावसाळा सुरू झाल्याने अन्य रोगांचा प्रादुर्भाव तसेच नालेसफाई कचरा प्रश्न आदींबाब पालिकेने केलेल्या उपायोजना बाबत लोकप्रतिनिधीना माहिती देण्यासाठी तसेच लोकप्रतिनिधी च्या सूचना जाणून घेण्यासाठी सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत विशेष सभेचे आयोजन करन्याची मागणी भाजप गटनेते शैलेश धात्रक यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदन दिले आहे या निवेदनात शैलेश धात्रक यांनी कोरोना काळात रुग्णवाहिकेची कमतरता,रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव,रुग्णांना वेळेवर औषधे न मिळणे तसेच औषधांची कमरता ,तज्ञ डॉक्टरांची कमरता ,आदीं समस्या आहेत ,तसेच कोरोना रुगांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली पासुन त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या काय उपाययोजण आहेत याची माहिती नगरसेवकांना मिळणे अपेक्षित आहे त्याच प्रमाणे पावसाळा सुरू झाल्याने पावसाळ्यातील अत्यावश्यल कामाची सद्य स्थिती काय आहे याबाबत माहिती मिळणे व या समस्यांबाबत आमच्या ही काही सूचना आहे यासाठी पालिकेने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सोशल डिस्टनसिंग चे पालन करत 600माणसांची क्षमता असलेल्या आचार्य अत्रे रंग मंदिरात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे अशी मागणी केली आहे .
No comments:
Post a Comment