शिवसेना विभागप्रमुखाच्या हल्लेखोराला कोळशेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
पुन्हा हल्ल्याच्या तयारीत होता आरोपी
कल्याण, अभिजित देशमुख : शिवसेना पदाधिकार्यावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या आरोपीला कोळशेवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे .हा आरोपी पुन्हा शर्मा यांच्या वर हलला करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे .मोहम्मद मुकीम उर्फ सोनू असे या आरोपीचे नाव असून त्याच्याजवळून एक देशी कट्टा व काडतुस जप्त केले आहे . कल्याण पूर्व शिवसेना विभागप्रमुख रककु शर्मा यांच्यावर तिघा जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होता .या हल्ल्यात शर्मा याना गंभीर दुखापत झाली होती मात्र सुदैवाने शर्मा या हल्ल्यातून बचावले होते . या नंतर कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघा विरोधात गुन्हा दाखल करत मुसीम ,इब्राहिम या दोन जनाना अटक केली होती .तर मुख्य आरोपी मोहम्मद मुकीम उर्फ सोनू हा पसार होण्यात यशस्वी झाला होता .तीन महिन्यापासून सोनू पोलिसांना गुंगारा देत होता पसार झालेल्या सोनूने पुन्हा रककु शर्मा यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यास सुरुवात केली होती .कोळशेवाडी पोलीस सोनूच्या मागावर होते अखेर पोलिसांना सोनू कल्याण पूर्व चेतना परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात सापळा रचत सोनू ला बेड्या ठोकल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस अधिकारी मधुकर भोंगे यांनी दिली सोनू कडून पोलिसांनी एक देशी कट्टा व जिवंत काडतुस ही जप्त केले आहे.
No comments:
Post a Comment