नियम न पाळणाऱ्या विरोधात पोलिसांची कारवाई सुरू
दोन दिवसात 792 जणांवर गुन्हे दाखल !
कल्याण : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मास्क घालण्यासह ,दुकानात गर्दी न करणे ,विनाकारण गर्दी न करणे ,दुकानात सॅनिटायझर वापरन्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. मात्र या सुचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या 792 जणांविरोधात कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले आहेत .
कल्याण डोंबिवली शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. साथरोग अधिनियमानुसार घराबाहेर पडताना मास्क घालणे पोलिसांनी बंधनकारक केले आहे.कधी बाहेर पडायची वेळ आली, तर मास्क घातल्याशिवाय अजिबात बाहेर जाऊ नका, प्रत्येक दुकानदारांनी दुकानात गर्दी जमूनये या करिता दुकाना समोर योग्य ती मार्किंग करून घ्यावी व आपल्या दुकान समोर सॅनिटायझर ठेवावे व वेळेच्या नियमाचे पालन करावे अशा सूचना वारंवार दिल्या जात आहेत. तरीही काही नागरिकांना अजूनही त्याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे .कल्याण परिमंडळ-3 हद्दीत- मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणे- 155 ,दुकानदारांनी दुकानाबाहेर सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणे त्याचप्रमाणे सॅनिटायझर व्यवस्था न करणाऱ्या 160 ,विनाकारण पाच पेक्षा जास्त लोकांनी उभे राहणाऱ्या 12,भा.द.वी 188 प्रमाणे- 465 आशा एकूण 792 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
No comments:
Post a Comment