Wednesday, 24 June 2020

कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचे आपत्तीच्या काळात तयार राहण्याच्या सूचना, ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी!

कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचे आपत्तीच्या काळात तयार राहण्याच्या सूचना, ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी!


कल्याण (संजय कांबळे) मागील वर्षी आलेल्या पुरामुळे म्हारळ वरप कांबा पावशेपाडा आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात जिवीत व वित्तहानी झाली होती हा अनुभव पाहता या वर्षी मान्सुन काळात असे काही होऊ नये म्हणून कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी मे महिन्यातच नदी काटच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची बैठक घेऊन आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी व करावी लागणारी उपाययोजना या बाबतीत कडक सूचना दिल्या असून यावर नियंत्रण व मदतीसाठी क्षत्रिय अधिका-याची नियुक्ती केली आहे.
कल्याण तालुक्यातील उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार नदीच्या काठावर अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावे आहेत. सांगोडा वासुद्री कोंढेरी, रुंदा, मोस, गुरवलीपाडा, खडवली ज्यू गाव, तर इकडील आपटी, रायते आणे भिसोळ,  मानिवली, पांजरपोळ, कांबा वरप म्हारळ या गावांपैकी म्हारळ वरप कांबा पावशेपाडा इथे पुराच्या पाण्याचा धोका अधिक असतो. मागील वर्षी आलेल्या पुरामुळे कांबा गावातील मोरया नगर येथील एकाचा मृत्यू झाला होता तर पावशेपाडा, कांबा बस स्टॉप परिसर, टाटापावर हाऊस, वरप गावभाग, साईबाबा नगर, शिवशक्ती नगर, दुर्गानगर, तर म्हारळ गावातील बहुतांश भागात पाणी भरले होते. या पुरामुळे जिवीत हानी अत्यल्प झाली असली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली होती. यावेळी शासकीय यंत्रणांना कडून हवी तशी व तात्काळ मदत मिळाली नाही. त्यामुळे हा अनुभव पाहता कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची बैठक घेऊन आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी व करावी लागणारी उपाययोजना यासाठी आवश्यक लागणारे साहित्य यामध्ये चार्जिंग बॅटरी, दोरखंड, तराफा बनविण्यासाठी ड्रम, ट्यूब, लाईफ जॅकेट आदी साहित्य खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
याशिवाय हद्दीत धोकादायक इमारती, विजेचे खांब, अर्धवट इमारती चाळी तसेच गावात धुरळणी फवारणी आदी बाबी कडे लक्ष देऊन उपाय योजना करण्यांत च्या सूचना दिल्या. 
कांबा ग्रामपंचायतीने ड्रम ट्यूब चार्जीग बॅटरी, दोरखंड आदी साहित्य घेतल्याचे सरपंच मंगेश बनकरी  आणि  ग्रामविकास अधिकारी ए जे इंगोले यांनी सांगितले तर लाईफ जॅकेट मागविली आहेत. अजून आलेली नाही असे म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान या सर्वांना मदतीसाठी आणि आपत्ती च्या काळात मार्गदर्शन करण्यासाठी क्षत्रिय अधिका-याची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये व्हि आर चव्हाण, एस एस संत, डि एस घोलप, श्रीमती व्ही व्ही परटोळे पी ए वानखेडकर, आणि पी एम जुमळे यांचा समावेश आहे
विस्तार अधिकारी चव्हाण यांच्या कडे म्हारळ वरप कांबा, गोवेली, रायते, रोहण, वाहोली, गुरवली आणि दहिवली या ग्रामपंचायती देण्यात आल्या आहेत. तर संत यांच्या कडे पिंपरी, दहिसर, वाकळण, नागाव, खोणी, नारिवली, वडवली शिरडोण, आणे भिसोळ, घोलप यांच्या कडे दहागाव, पोई, फळेगाव, सांगोडा, मामणोली, कुंदे, म्हसकळ, श्रीमती परटोळे, खडवली, गेरसे,  कोसले, पळसोली, वेळे, आपटी मांजर्ली, घोटसई, राया, वानखेडकर यांच्या कडे जांभुळ, वसत शेलवले, बापसई, मानवली, उतणे, नडगाव, रुंदे तर शाखा अभियंता जुमळे यांच्या कडे केळणी, चवरे, निंबवली, नांदप, वासुद्री, काकडपाडा आणि उशीद या ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी प्रशासनाने फुल तयारी केली आहे. 

No comments:

Post a Comment

ऐरोली-काटई फ्रीवेचे उर्वरित काम दृष्टीपथात: भूसंपादनाची प्रक्रिया सुरु !!

ऐरोली-काटई फ्रीवेचे उर्वरित काम दृष्टीपथात: भूसंपादनाची प्रक्रिया सुरु !! *कल्याण, प्रतिनिधी* मुंबई फ्रीवेच्या धर्तीवर उभारण्यात...