"दै.बातमीदारचा परिणाम" रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने जमिन दोस्त केलेला शासनाचा दहा लाखाचा बंधारा एका दिवसातच बांधुन पुर्ण !!
'प्रहार संघटनेने केली होती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी '
मुरबाड (मंगल डोंगरे ) रस्त्याच्या कामात बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अडथळा येतो म्हणून चक्क ठेकेदाराने बेकायदेशीरपणे हा शासनाने बांधलेला बंधाराच जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केला होता,*याबाबत प्रहार संघटनेने ठाणे जिल्हा परिषदेकडे तक्रार करून या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.मात्र दै.बातमीदार या वर्तमान पत्रात त्याची फातमी छापून येताच
अँन्युटी हायब्रीड या कन्स्ट्रक्शन कंपनीने या बातमीची दखल घेवून आपल्यावर कायदेशीर कारवाई होवू नये म्हणून म्हसा - धसई रस्त्यालगत असलेला आणि गोरखगड येथे तूळई, देहरी, तळेखल, देशमुख पाडा, उचले येथील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी नैसर्गिक नाल्यावरील जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून 9 लाख, 49 हजार, 722 रुपये खर्चून सिमेंटचा के.टी.बंधारा म्हणून बांधण्यात आलेला बंधारा अवघ्या एकाच दिवसात बांधून पुर्ण केला आहे.
त्यामुळे मुरबाड तालुक्यात दै.बातमीदार वर्तमान पत्राचे आणि प्रहार संघटनेचे शरद पाटील यांचे सर्वच स्तरातुन आभार मानले जात आहे.
{ दै.बातमीदार इम्पँक्ट }


No comments:
Post a Comment