Tuesday, 23 June 2020

भिवंडी शहरात "आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली", स्थनिक महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांची डोळेझाक !!

भिवंडी शहरात "आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली", स्थनिक महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांची डोळेझाक !!


भिवंडी, प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे, १ जून पासून लॉकडाऊन मधे शिथिलता देण्यात आली तेंव्हापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.


या पार्श्वभूमीवर सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांनी आपल्या स्थरावर उपाययोजना करून यावर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
भिवंडी हे औद्योगिक शहर असून येथे सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, शहर नवीन हॉटस्पॉट ठरत आहे म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त यांनी शहारात १५ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला ज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकानांना मनाई करण्यात आली व गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीस व प्रशासन च्या अधिकाऱ्यांना काळजी घेऊन नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर सख्त कारवाईचे आदेश देण्यात आले, पण आमच्या भिवंडी शहारातील प्रतिनिधीने  गैबीनगर, शांतीनगर परिसराचा दौरा केला असता या भागातील नागरिक व दुकानदार कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आले, येथे जीवनावश्यक वस्तूंची सोडून सर्व प्रकारची दुकाने चालू आहेत तर ऑड इवहन फॉर्म्युला सुध्दा पाळला जात नाही, सोशल डिस्टंस अजिबात नाही दिसत व बरेच नागरिक व दुकानदार मास्क वापरत नाहीत. या सर्व गोष्टींकडे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करताना दिसत आहेत, प्रतिनीधीने स्थानिक नागरिकांशी व दुकानदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तर काही सुज्ञ नागरिक म्हणाले आम्ही या विषयी तक्रार केली तरी कोणतीही कारवाई होत नाही आहे.


स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकरीता जी मिलीभगत चालू आहे त्यांनी शहराला गंभीर समस्या निर्माण होईल.
तरी स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त व पोलिस उपायुक्त यांनी नागरीकांच्या सुरक्षितेसाठी लक्ष देऊन यावर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे.
"जान है तो जहान है"

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...