एपीएमसीच्या आवारातील गुरांचा बाजार सुरू ....
कोरोनाचाच्या पार्श्वभूमीवर अटी शर्तीसह परवानगी !!
कल्याण, अभिजित देशमुख : कल्याण कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या आवारातील गुरांचा बाजार सुरू करण्यास पालिका आयुक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी शर्थी ठेवून परवानगी दिली आहे .तर अटी शर्तीचे उल्लंघन केल्यास बाजार तत्काळ बंद करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे .रविवार वगळता हा बाजार सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यन्त सुरू असणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराचे नियम पाळून तसेच आठवड्यातून दोन या परिसरात निर्जंतुकीरकरन करणे बंधनकारक करन्यात आले आहे .
सध्या खरीप हंगाम लक्षात घेता शेती व पशुधनाची खरेदी विक्री सुरु होणे आवश्यक असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरांचा बाजार सुरु करणेबाबत मागण्यात आलेल्या परवानगीच्या अनुषंगाने बाजार समितीच्या आवारात गुरांचा बाजार सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, सदर ठिकाणी विक्रेत्यांना बसण्यासाठी तसेच नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी गोल/चौकानाची आखणी करणे आवश्यक आहे. प्रवेशद्वारावर तसेच ये-जा करण्याच्या ठिकाणी व सामायिक जागेत थर्मल स्क्रिनींग व हॅन्डवॉशची व्यवस्था करणे, आवारात येणा-या प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व गर्दी टाळणे बंधनकारक राहील सदरचा बाजार दररोज सकाळी 9.ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहील , त्याचप्रमाणे दर रविवारी बंद राहनार आहे तसेच आठवडयातून दोन वेळा समितीच्या आवाराचे निर्जंतुकीकरण करणे देखील आवश्यक राहील.वरील अटी व शर्तीचे उलघंन केल्यास सदरची परवानगी रद्द करण्यात येईल असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्गमित केले आहेत.
No comments:
Post a Comment