Sunday, 14 June 2020

ठेकेदाराच्या आडमुठेपणाचा फटका नागरिकांना ,म्हसा-धस ई,टोकावडे रस्ता वाहतुक बंद,, शेतकऱ्यांची शेतीची कामे रखडली,,

ठेकेदाराच्या आडमुठेपणाचा फटका नागरिकांना ,म्हसा-धस ई,टोकावडे रस्ता वाहतुक बंद,,
शेतकऱ्यांची शेतीची कामे रखडली,,


मुरबाड ( मंगल डोंगरे ) गेल्या  सहामहिण्यां पासुन म्हसा- धस ई-टोकावडे या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते.मात्र ठेकेदाराच्या आडमुठे पणामुळे अचानक सुरु झालेल्या पावसामुळे व अपुर्ण पुलांच्या.बांधकामांमुळे रस्ता पुर्णत:बंद झाल्याने त्याचा फटका या मार्गावरील देहरी,तळेखळ,उचले,देशमुखपाडा, खोपिवली, खुटारवाडी, मिल्हे, ताडाचापाडा, दूधनोली, परिसरातील नागरिकांना बसला असुन गाव सोडून बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाल्याने शेतीची कामे रखडली आहोत. तर कालच्या पावसात खोपिवली भामख़ोर नदीच्या पुराच्या पाण्यात पर्यायी रस्ता वाहुन गेला तर पुलाचा स्लँब कालच टाकल्याने वाहनांसह पायी प्रवासही बंद झाला असुन यावर ठेकेदार आणि सबठेकेदार यांनी तात्काळ उपाय योजना न केल्यास खोपिवली परिसरातील नागरिक आंदोलन छेडणार असल्याची माहिती युवा कार्यकर्ते मुकुंद कराळे आणि राजेश पाटील भुंडेरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.



            ज्या नँशनल बांधकाम कंपनीने ह्या रस्त्याचे काम घेतले आहे.त्या कंपनीने कुठलाही मागचा पुढचा विचार  न करता या रस्त्यावरील  मो-या,पुल एकहाती तोडून टाकले.आणि मग रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात केली.मात्र कोरोनाच्या महामारीत सततच्या लाँकडाऊन परिस्थितीत ज्या वेगाने पुलं,आणि मो-या तोडण्यात आल्या. तो वेगच कोरानाने हाणुन पाडला आणि  कामांची स्थिती चिंताजणक बनत गेली.त्यात ठेकेदाराने बनविलेले पर्यायी रस्ते हे थातुरमातुर थूकपट्टी लावून बनविले असल्याने. ते पहिल्याच पावसात वाहुन गेले.तर पुलांचे व मो-यांचे स्लँब न पडल्याने रस्ते वाहतुकीसाठी ठप्प झाले असुन ऐन शेतीच्या हंगामात या परिसरातील शेतक-यांना बि-बियाने,खते,औषधे,घेण्यासाठी गावाबाहेर जाणे अशक्य झाले आहे.तर कोरोनाच्या महामारीत कसातरी जिव वाचविणा-या शेतकऱ्यांवर आता पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे.यंदाच्या पावसाळी हंगामात शेती लागलीच नाही, तर पुढील वर्षी खाणार काय या विवंचनेत असलेला शेतकरी आता कुठलेही बंड करावयास तयार झाला असुन, सर्व सामान्य जनतेला वेठीस धरणा-या ठेकेदार कंपनीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने   कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून तात्काळ कारवाई करावी. अन्यथा सदर ठेकेदार कंपनी विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यार असल्याचे  परिसरातील नागरिकां कडून बोलले जात आहे.सदर कंपनीने मो-यांच्या बांधकामात तसेच रुंदीकरणाच्या.कामात निक्रुष्ठ मटेरिअल वापरला असल्याचे नागरिकांचे म्हणणे असुन या कंपनीच्या कामाची ही खातेनिहाय चौकशी व्हावी,असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...