Saturday, 13 June 2020

*उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनचा मनमानी कारभार महिलेची हत्या ला आत्महत्या दाखवणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न गुन्हा नोंद करण्यास पोलिसांची टाळाटाळ*

*उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनचा मनमानी कारभार महिलेची हत्या ला आत्महत्या दाखवणाऱ्या आरोपीला  पोलिसांकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न गुन्हा नोंद करण्यास पोलिसांची टाळाटाळ*


उल्हासनगर, आदर्श भालेराव : 24 मे 2020 रोजी उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत हत्या सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आकस्मित मृत्य दाखवून महिलेने  घरातील किरकोळ वादा वरून गळफास घेऊन आत्महत्या केली असे भयानक प्रकार हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत घडला.  कोरोना महामारी चा गैरफायदा घेत सदर गुन्ह्यातील आरोपीला पाठीशी घालण्याचा भयंकर प्रकार उल्हासनगर हिल लाईन पोलीस करत आहेत असा आरोप मृत महिलेच्या आई व भावाने केला आहे 
पोलीस स्टेशनच्या भानगडीत पडू ना गुन्हा दाखल करू नका त्याबद्दल पाहिजे तेवढे पैसे घ्या असे मृत हेतलच्या सासरील लोकानी हेतल च्या आई ला सांगितले.
मृत्यू झालेल्या मुलीच्या आईने सदर आपल्या मुलीच्या मारेकरी विरुद्ध गुन्हा नोंद व्हावा त्यामुळे मुलीच्या आईने हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली.व माझ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या झाली नाही माझ्या मुलीची संशयावरून तिच्या सासरच्या लोकांनी कट रचून हत्या केली आहे. 
आपण खुनाचा गुन्हा नोंद कारवा असे कळकळीची विनंती मृत मुलीच्या आईने अनेक वेळा पोलिसात केली. पोलिसांनी कोणतेही दखल घेतली नाही .माझ्या मुलीचा पोस्टमाटम जेजे रुग्णलायत करावा अशी मागणी केली मृत मुलीच्या आईने केली  होती. पण पोलिसांनी पोस्टमाटम साठी 25 हजार रुपये तुम्हाला खर्च करावा लागेल अशी भीती घालून मृत्यू मुलीच्या आई विरुद्ध  कोणतेही परवानगी न घेता बळजबरी उल्हासनगर सिव्हिल रुग्णालयात पोस्टमाटम केला. मृत्य झालेल्या मुलीच्या आईने मुलीच्या सासरी लोकांना विरुद्ध गुन्हा दाखल करा म्हणून पोलिसांत धाव घेतली असता हिल लाईन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संजय सावंत यांनी पोस्टमटम रिपोट आल्या शिवाय कोणताही गुन्हा दाखल होणार नाही म्हणून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. मृत मुलीच्या आईने गुन्हा दाखल व्हावा  म्हणून लेखी तक्रार अर्ज ही देण्याचा पोलीस स्टेशन मध्ये  प्रयत्न केला तेव्हा मुलीच्या आई व भावला  कोरोना महामारी चा कारण सांगत ठाणे अंमलदार यांनी  दमदाटी करून पोलीस स्टेशन मधून हाकलून लावण्यात आले.  24 मे 2020 पासून हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये  अनेक वेळा मुलीच्या आईने व भावाने चकरा मारून सुद्धा अद्याप घडलेल्या गुन्हा बाबत पोलीस  गुन्हा नोंद करून घेत नाही ही अशी तक्रार मृत मुलीची आई व भावाची आहे. 

3 मार्च 2020 रोजी हेतल चा पती नाईट ड्युटी वर गेला असता  रात्री एक वाजता  दार ठोकलेला आवाज आला  हेतल घरात झोपले असता दाराची कडी वाजली दरवाजा कोणी ठोकला म्हणून रात्री 1 च्या सुमारास हेतल ने दरवाजा उघडला असता घरात शेजारील सनी नामक मुलगा उभा होता दरवाजा का ढोकळा म्हणून त्याला विचारले असता अचानक तेथे हे  हेतल चे पती  व सासरील  नातेवाईक घराजवळ आले हेतल वर सनी वर  संशय आरोप लावत  हेतल व सनी याला घरात घेऊन मारहाण केली  होती.असा ही आरोप मृत महिलेचे आईने ने केला आहे.
हेतल चा पती हेतलवर  संशय करत सतत  मारहाण करत होता त्यामुळे  3 मार्च 2020 रोजी हेतल ने आपल्या पती व सासरील लोकांन विरुद्ध महिला तक्रार निवारण कक्ष उल्हासनगर येते दुसऱ्यांदा।  तक्रार दाखल केली होती. तेव्हा हेतल च्या पत्नीने व सासरील लोकांनी हेतल सोबत तडजोड करत तिला परत सासरी घेऊन गेले होते. घेऊन गेल्या नंतर ही संशय वरून  पती हेतल सोबत वाद विवाद करत हेतल ला मारहाण करत होता  असा ही आरोप हेतल च्या आईने केला आहे .  दिनांक 24 मे 2020 रोजी हेतल ला संशय मूळे कोरोना महामारी चा गैरफायदा घेत कट  रचून काही पोलिसांना हाताशी घेऊन हेतल च्या पती व सासरील लोकांनी  संशय चा राग मनात ठेवू  व सतत  हेतल आपल्या पती विरुद्ध व  सासरील लोकांन विरुद्ध महिला तक्रार  निवारण कक्ष मध्ये तक्रार करत असते तिसऱ्यांदा जर परत हेतल महिला तक्रार निवारण कक्षात तक्रार केली तर हेतल च्या  पती व सासरील लोकांन विरुद्ध  कोटूंबिक हिंसाचार विरुद्ध गुन्हा नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गुन्हा नोंद झाल्यास परिवाराची बदनामी होईल परिवाराला जेल कोर्ट कचेरी बघण्याची वेळ येईल अशी भीती मनात ठेवून हेतल ची कट रचून हत्या केली . 
  व हेतल च्या हत्याला आमहत्या दाखवली आहे. जेव्हा हेतल ने  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असे हेतल च्या पत्नीने हेतल च्या परिवारास कळविले असता 15 मिनिटात हेतल चा भाऊ व व आई हेतलच्या घरी आले पण त्यांना कोठे ही हेतल ने गळफास घेतलेली आढळून आले नाही किंवा हेतल ने कोणत्या  साहित्याने ने गळफास घेतली अशी ही साहित्य हेतल च्या आई ला व भावाला आढळून आले नाही. हेतल ची आई हेतल च्या घरी पोहचण्या आगोदर हेतल च्या पतीने हेतलने गळफास घेतले  साहित्य नष्ट केले असा आरोप हेतल ची आई करत आहे 
         संशय चा राग मनात ठेवून  व कोटूंबिक हिंसाचा गुन्हा दाखल होण्याच्या भीती पोटी हेतल चे पती व सासरील लोकांनी हेतल ची कट रचून हत्या केली आहे. कोरोना महामारी मध्ये पोलीस व डॉक्टर व्यस्त असल्याचा गैर फायदा घेत कट रचून हेतल ची हत्या करून तिला आत्महत्या दाखविले जात आहे अनेक वेळा पोलिसात धाव घेऊन सुद्धा पोलीस गुन्हा दाखल करत नाही व कोरोना महामारी सांगून पोलीस स्टेशन मधून हेतल च्या आई ला व भावाला दमदाटी करत अनेक वेळा हाकलून लावण्यात आले आहे . असा ही आरोप हेतल च्या आई व भावाने केला आहे.
 लॉक डोउन चा गैरफायदा घेत हत्या सारख्या गँभिर गुन्हाला आत्महत्या दाखवून आरोपी ला पाठशी घालण्याचा गंभीर प्रकार हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत घडला.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...