"कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत डॉ. पराग पाटील यांचा मृत्यू"
कल्याण पूर्वेतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पराग पाटील यांचा कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत शहीदी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे !
डॉ. पराग पाटील अखेरपर्यंत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करत होते यात त्यांना केव्हा कोरोनाची लागण झाली हे समजलेच नाही !
समजले तेव्हा 14 दिवसांची मृत्यूशी झुंज सुरू झाली ! ती अखेर समाप्त झाली !डॉ. पराग पाटील हे शहीद झाले !
शहीद म्हणण्याचे कारण म्हणजे या कोरोनाच्या लढाईत खाजगी असो की सरकारी डॉक्टर्स , नर्सेस , मेडिकल स्टाफ आणि पोलीस हेच फ्रंटलाईनवर राहिल्याने मोठ्या प्रमाणावर जीविताचे रक्षण झाले आहे !
डॉ. पराग पाटील यांचा मृत्यू हा न विसरता येण्याजोगा आहे !
विनम्र श्रद्धांजली !!

No comments:
Post a Comment