Sunday, 21 June 2020

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नसतानाही शाळा बंद करण्यापेक्षा : "शिक्षकांना मुख्यालयी वास्तव्य करणे सक्तीचे करा.श्रमजिवी संघटनेची मागणी"

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नसतानाही शाळा बंद करण्यापेक्षा : "शिक्षकांना मुख्यालयी वास्तव्य करणे सक्तीचे करा.श्रमजिवी संघटनेची मागणी"


मुरबाड {  मंगल डोंगरे  }   कोरोना कोविड-- 19 या महामारीने जनमानसांचे जीवनमान धोक्यात आणले असले तरी ,ग्रामीण भागात याचा प्रादुर्भाव नसल्याने शासनाने लाँकडाऊन चे कारण पुढे करत शाळा सुरु करण्यास आदेश नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी शिक्षकांना मुख्यालयी म्हणजे शाळेच्या ठिकाणी वास्तव्य करण्याची सक्ती करावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे दिनेश जाधव यांनी शिक्षणाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

       कोरोना कोविड 19 या महामारीने जगभरात  भयभीत वातावरण निर्माण केले असुन त्यामुळे अनेक जणांचे बळी देखील घेतले आहेत. परंतु हा संसर्ग शहरी भागात असल्याने त्याचा शहरी भागातील गर्दीच्या वातावरणात संसर्ग होऊन एकदुसऱ्याला त्याची लागण होते.दरम्यान शहरी भागापासून कोसोमैल  दुर असणाऱ्या आदिवासी भागात शहरी भागातील नागरिक जात नाहीत. गेला तर काही कामा निमित्ताने  ,परंतु ग्रामीण भागातील नागरिक मात्र नाहक शहरी भागात जात नाही. 

      त्यामुळे त्याला या कोरोनाची लागण होण्याचा प्रश्नच नाही.मुरबाड तालुक्याचा 90%भाग हा ग्रामीण असल्याने तेथील शाळावर असणारे शिक्षक हे कल्याण ,डोंबिवली, बदलापुर या ठिकाणी वास्तव्य करीत असल्याने तेथुन सुमारे 80 ते 90 कि.मी.चा प्रवास करुन येतात. शिवाय त्या ठिकाणी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने ते शिक्षक जर शाळेवर आले तर त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यासाठी शाळा बंद  ठेऊन शिक्षकांना घरी बसुन पगार देण्यापेक्षा व  विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शिक्षकांना शाळेच्या ठिकाणी वास्तव्य करण्याची सक्ती करण्यात यावी.अन्यथा विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी श्रमजीवी संघटनेला सनदशीर मार्गाने आंदोलन छेडावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

      "श्रमजीवी संघटनेने केलेली मागणी हि योग्य असुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तशा प्रकारचा ठराव शाळा व्यवस्थापन कमिटीने घेतल्यास पुढील कार्यवाही केली जाईल" -- कल्पना खरपडे. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, मुरबाड.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...