महावितरणने पाठवली हजारो रुपयांची बिले,नागरिक झाले हैराण..
नागरिकांच्या बिलाची दुरुस्ती करा आणि तोडगा काढा,अन्यथा मैदानात उतरणार...
रिपब्लिकन पार्टीचा इशारा
कल्याण :- कोरोनाचे संकट,लाॅक डाऊनमुळे अनेकांना कामे मिळत नाहीत.नोक-या गेल्या आहेत आणि पगार सुद्धा कपात झाली आहे.त्यात आता नागरिकांना महावितरणने हजारो रुपयांची बिले पाठवून 'शॉक' दिला आहे.वाढीव आणि महिन्याला दोनदा वीजबिले ग्राहकांना आकारले जात आहे.ग्राहक वीजबिल्यासंदर्भात महावितरण कार्यालयात गेले असता तुमच्या वीज मीटरचे रिडींग तुम्हीच आणा, अर्ज करा नंतर आम्ही विचार करू, अशी उत्तरे अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग देत आहेत.लॉकडाऊन मध्यें हाताला काम नसल्याने वीज बिल भरणार कसे असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला असताना वाढीव बिले देण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे.याबाबत ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी रिपाईचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली आहे.तर ग्राहकांकडून 3 महिन्यांचे सरासरी बिल घेऊन सुद्धा आता हजारो रुपयांची बिले पाठवली आहेत.यावर समाधानकारक तोडगा काढावा अन्यथा या विरोधात लोकांसोबत आरपीआय मैदानात उतरेल असा इशारा अंकुश गायकवाड यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment