Sunday, 21 June 2020

"भुसावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा"!

"भुसावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा"
!


भुसावळ प्रतिनिधी :- येथील रेल्वे विभागात आज दि.२१ जुन रविवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आजची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इंटरनेटच्या माध्यमातून सकाळी ७ वाजता योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक विवेक कुमार गुप्ता,अप्‍पर विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक मनोजकुमार सिन्हा व सर्व रेल्वे अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच परिवारातील सदस्य यांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभाग नोंदविला आणि योग साधना घरूनच केली. या ऑनलाईन योग सत्रात योग साधनेचे प्रात्यक्षिक योग शिक्षक एन.पी. परदेशी यांनी सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुळकर्णी आणि ग्रंथपाल संतोष उपाध्याय यांनी केले.यात प्रत्येक आसनाची माहिती आणि लाभ याची माहिती बारकाईने देण्‍यात आली. या कार्यक्रमासाठी रेल्वे स्कूलचे उपप्राचार्य, स्वाती चतुर्वेदी,कला शिक्षक आर.पी. जावळे व रेल्वे स्कूलचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,डीबीए देवेंद्र विश्वकर्मा व त्‍यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्‍ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुसावळ कार्मिक शाखेच्‍या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...