Sunday, 21 June 2020

सावधान! म्हारळ मध्ये कोरोना कोव्हीड चे रुग्ण वाढत आहे, एकाचा मृत्यू, बेड मिळत नसल्याने घरीच कोरोनटांइग?

सावधान! म्हारळ मध्ये कोरोना कोव्हीड चे रुग्ण वाढत आहे, एकाचा मृत्यू, बेड मिळत नसल्याने घरीच कोरोनटांइग?


कल्याण (संजय कांबळे) ऐवढे दिवस कोरोनोच्या महामारी पासून दूर राहिलेल्या कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात कोरोना कोव्हीड 19 चे रुग्ण वाढत असून आतापर्यंत 17 पेंशंट कोरोना पाॅझिटिव आले असून यातील काही बरे होऊन घरी आले असले तरी एका पोलीसाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे तर काही पेंशंट ना इतर हाॅस्पिटल मध्ये बेड मिळत नसल्याने त्यांचेवर घरीच कोरोनटांइग होण्याची वेळ आली आहे त्यामुळे इतरांनी स्वतः ची काळजी घेऊन सोशलडिस्टींग चे पालन करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी व ग्रामपंचायत यांनी केले आहे.
कोरोनाने शेजारच्या उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर, टिटवाळा, कल्याण डोंबिवली या शहरात धुमाकूळ घातला असताना कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात तसा कोरोना अॅक्टीव झाला नव्हता. जे एक दोन पेंशंट साडत होते ते नोकरी काम धंदा निमित्ताने बाहेर जाणारे होते. कांबा वरप येथे कोरोनाचे अत्यल्प प्रमाण असले तरी म्हारळ गावात मात्र ते झपाटय़ाने वाढत आहे. लाॅकडाऊण मध्ये शिथिलता दिल्याचा नांगरिकानी गैरफायदा घेऊन विनाकारण गावात, रस्त्यावर, चौकात गर्दी केली, म्हारळ मध्ये तर सोशलडिस्टींग चे तिनतेरा वाजले याचाच परिणाम आज गावात 17कोरोना कोव्हीड चे रुग्ण आढळून आले आहेत. या भागाला कोरोना कोव्हीड केअर सेंटर नसल्याने आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेने वेळीच उपाययोजना न केल्याने आज या परिसरातील पेंशंट ना भिवंडी, उल्हासनगर, किंवा ठाणे येथे बेड शिल्लक नाही म्हणून दाखल करून घेतले जात नाही. परत पाठवले जात आहे.
म्हारळ ग्रामपंचायत, गावातील लोकप्रतिनिधी या पेंशंट करिता प्रयत्न करत आहेत परंतू वरिष्ठ पातळीवर आमच्या कडे पेंशंट "हाऊसफुल्ल" झाले आहेत असे सांगण्यात येते. त्यातच म्हारळ गावाची लोकसंख्या सुमारे 50/60 हजाराच्या वर असल्याने ग्रामपंचायत काय करणार? अशात आपली म्हारळ, वरप, कांबा ही गावे पाच ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे हद्दीत, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश राठोड, आरोग्य सेवक तालिगोटे हे सोडले तर बाकी सगळे उंटावरून शेळ्या हाकणारे, फोन उचलत नाही, फोन लागत नाही हे तर आहेच,अशा तक्रारी स्वत लोकप्रतिनिधी करताहेत 
ऐकट्या म्हारळ गावाचा विचार केला तर येथे रोज दोन ते तीन कोरोना पाॅझिटिव रुण्ग आढळून येत आहेत. यांना कोठेही दाखल करून घेतले जात नाही. वरप येथील कोव्हीड केअर सेंटर सुरू व्हायला अजून काही दिवस जातील. तोपर्यंत पेंशंट चा "आकडा" किती होईल याचा विचार करा. अशी भीती दस्तुरखुद्द आरोग्य अधिकारी व कर्मचारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे म्हारळ गावची अवस्था पाहून शेजारच्या वरप कांबा या ग्रामपंचायतीने वेळीच शहाणे होऊन काळजी घ्यायला हवी अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. तसेच नागरिकांनी सोशलडिस्टींग चे पालन करुन स्वतःच्या कुंटूबासह इतरांची काळजी घेणे हे काळाची गरज बनले आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...