नडगाव ग्रामपंचायत हद्दीत "गंगा आली रे अंगणी" पाणी टंचाई दूर होणार?
कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नडगाव - दानबाव येथील ग्रामस्थांची पाणी टंचाई आता दूर होणार असून याचे कारण असे की येथे मारलेल्या बोअरवेला मोठ्या प्रमाणात पाणी लागले आहे. त्यामुळे आता गंगा आली रे अंगणी असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
खडवली पासून काही अंतरावर नडगाव - दानबाव ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथे आरोग्य विभागाचे उपकेंद्र देखील आहे. येथील नडगाव आणि दानबाव मधील 2हजार 765 नांगरिकाना पाण्याची सोय म्हणून नळयोजना, विहिरी आणि बोअरवेल आहे पण ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते यामुळे नडगाव गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी 14 व्या वित्त आयोगातून बोअरवेल मारण्याची सूचना केली. त्यानुसार सर्व सोपस्कार पूर्ण केले विशेष म्हणजे कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी यामध्ये लक्ष घातले व पाठपुरावा केला. या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एच ऐ घरत यांनी जागा मालकांशी बोलून तिही अडचण दूर केली. बोअरवेल खोदण्यासाठी गाडी आली पण पाऊस पडल्यामुळे गाडी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. पण तरीही खचून न जाता छोटी मशीन नेऊन बोअरवेल खोदण्यात आली. सुदैवाने येथे पाणी मोठय़ा प्रमाणात लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तर हे सर्व कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि सरपंच व सदस्यांनी मेहनत घेऊन झाल्याचे नडगाव दांणबाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एच ऐ घरत यांनी सांगितले. त्यामुळे प्रयत्न कोणाचेही असो पण नडगाव परिसरातील नागरिकांची पाणी टंचाई दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.


No comments:
Post a Comment