'ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत !!
"ठाणे जि.प. उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द"
मुरबाड ( मंगल डोंगरे ),आज संपुर्ण जगावर कोरोनाचे संकट आलेले आहे.महाराष्ट्र सुद्धा या वैश्विक महामारीचा कठीण सामना करत असल्याने या कठीण परिस्थितीत महाराष्ट्राला भरीव अर्थिक मदतीची गरज असल्याने ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने महाराष्ट्र शासनास एक हात मदतीचा म्हणून एक लाख रुपयांची मदत केली आहे.
पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षक नेते स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा ठाणे जिल्हा यांच्या सहकार्यातुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १,००,०००( एक लाख रु.)ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सभासद,केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनी दिला आहे.
शनिवार २० जून रोजी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष , युवा नेतृत्व श्री.सुभाषदादा पवार यांच्याकडे मुरबाड पंचायत समिती उपसभापती अनिलजी देसले व जिल्हा परिषद सदस्या तथा शिक्षण समिती सदस्या मा.रेखाताई कंटे ,जेष्ठ नेते रामभाऊ दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा संघाचे नेते श्री.जयवंतजी मुरबाडे,जिल्हाध्यक्ष भगवान भगत,जिल्हा सरचिटणीस वसंत पडवळ,पतपेढी संचालक राजेंद्र सापळे,पदवीधर जिल्हाध्यक्ष गणेश रिकामे, आदींनी सुपुर्द केला.
यावेळी गव्हर्नमेंट सर्व्हंट्स पतपेढी संचालिका कांचन चौधरी,रंजना डोहळे,शुभांगी पवार,विकास भोईर,रविंद्र घरत,श्री.दिपक पाटोळे,तानाजी जाधव,रघुनाथ ईसामे,अशोक सोनावणे,सोमनाथ सुरोशे,काशिनाथ राऊत,हनुमंत मोहपे,सुनिल देशमुख,भरत भांडे,सोपान गोल्हे,रविंद्र मोहपे,शैलेश ईसामे,संतोष डोंगरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेश ईसामे यांनी तर वसंत पडवळ यांनी आभार व्यक्त केले.

No comments:
Post a Comment