भुवन गावात लाखो रुपयाची देशी विदेशी दारु जप्त * पोलीस पाटलाचे गैरहजेरीत पंचनामा *कारवाई आणि मुद्देमाल गुलदस्त्यात !!
मुरबाड { मंगल डोंगरे } लाँकडाऊनमुळे मुरबाड शहरातील वाईन शाँप बंद असल्याने चोरट्या मार्गाने मद्य विक्रीला उधाण आले असुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नुकताच भुवन गावात सायंकाळी पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयाची देशी विदेशी दारु हस्तगत केली मात्र स्थानिक पोलीस पाटील यांच्या समक्ष पंचनामा न करता विक्रेत्यावर झालेली कारवाई व मुद्देमाल हा गुलदस्त्यात असल्याने मुरबाड पोलीसांचे कारवाई बद्दल नागरिक संशय व्यक्त करित आहेत.
तालुक्यातील शहरी औद्योगिक व ग्रामीण भागात लाँकडाऊनचे काळात वाईन शाँप बंद असले असल्याने सर्वत्र देशी विदेशी दारुचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता.त्यामुळे तळीरामांनी हि महागडी दारु पिण्यापेक्षा हातभट्टी च्या दारुवर आपला मोर्चा वळविला .परंतु या हात भट्टी चा आस्वाद घेण्यासाठी शहरातील तळीराम ग्रामीण भागात येऊ लागल्याने हि मद्य विक्री होऊ नये व.कोरोना या महामारीचा संसर्ग होऊ नये म्हणुन पोलिसांनी सर्वत्र सतर्कता बाळगली होती त्यासाठी तालुक्यातील खाटेघर. कोरावळे.उचले.या भागात सुरु असलेल्या हातभट्ट्या पोलिसांनी उध्वस्त केल्याने तालुका दारु मुक्त केल्याने महिला वर्ग हा पोलिसांना धन्यवाद देत होता कारण त्या दारुमुळे घरातील तंटे वाद हे बरेच कमी झाले होते .
दरम्यान काही शौकीन तळीराम हे मिळेल त्या भावाने देशी विदेशी दारु खरेदी करत आहेत परंतु हि दारु मुरबाड शहरात मिळत नाही .परंतु कल्याण बदलापूर उल्हासनगर या भागातील वाईन शाँप हे सुरु असल्याने दारु माफियांनी तेथील दारु ग्रामीण भागात आयात करुन तीची खुलेआम विक्री सुरु केली होती. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुवन गावात सकाळ संध्याकाळ तळीरामांची वर्दळ सुरु झाल्याने काही जागृत ग्रामस्थांनी हि बाब पोलिसांचे निदर्शनास आणून दिली असता पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला मात्र त्याचा स्थानिक पोलीस पाटील यांचे समक्ष पंचनामा न करता तो मात्र पोलीस ठाण्यात घेऊन गेले असले तरी सदरची कारवाई हि गुलदस्त्यात असल्याने पोलीसांनी केलेल्या कामगिरी वर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी गावातील एका दुकानात धाड टाकुन दारुचे बाँक्स हस्तगत केले .परंतु मी स्थानिक पोलीस पाटील असताना मला पंचनामा करण्यासाठी न बोलवता तो माल परस्पर घेऊन गेल्याने पुढे काय कारवाई झाली हे गुलदस्त्यात आहे--नारायण भागोजी भोईर. पोलीस पाटील .भुवन.
No comments:
Post a Comment