कल्याण पंचायत समितीचे बनावट सही शिक्के प्रकरणी आस्थापना कर्मचारी व गटविकास अधिकाऱ्यांची बडतर्फीची मागणी, तर कोरोनोच्या काळात अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांच्या हक्कालपट्टीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्र!
कल्याण (संजय कांबळे) कल्याण पंचायत समितीच्या यंत्रणेबाहेरील व्यक्ती ने पंचायत समिती कार्य क्षेत्रात बनावट सही शिक्के वापरले, या तक्रारीवरून चौकशी अंती हे सिध्द झाले जिल्हा परिषदेच्या तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी संबंधितांवर कारवाई चे आदेश दिले पंरतु जाणीवपूर्वक कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे आणि आस्थापना कर्मचारी नितीन घोडके, डॉ घोरपडे यांना सक्तीचे रजेवर पाठवून या अधिकारी व कर्मचारी यांची विभागीय चौकशी करून यांना बडतर्फ करावे अशी मागणी तक्रारदार एकनाथ मंंगल सोनावणे यांनी केली आहे तर कोरोनोच्या वाढत्या काळात कल्याण तालुक्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्या-या गटविकास अधिकाऱ्यांची तालुक्यातून हक्कालपट्टीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठविण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे
कल्याण पंचायत समितीचा भोंगळ कारभार तसा काही नवीन नाही. लोकप्रतिनिधींच्या राजवटीनंतर यात सुधारणा होईल, त्यांचा प्रशासनावर अंकुश राहिल असे वाटले होते पण लोंकांंची घोर निराशा झाली. येथे पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाही तिथे सर्वसामान्यांचे काय?
याचा प्रत्यय अनेक मासिक सभांमधून सदस्यांना आला आहे. काही मोजके विभाग सोडले इतर विभागात सर्व काही आलबेल आहे पंचायत समितीची मालमत्ता उद्या इमारत, कपाटे कागदपत्रे, सही शिक्के हे सांभाळणे त्या त्या अधिकारी व कर्मचारी यांचे कर्तव्य आणि जबाबदारी असताना या यंत्रणे बाहेरील व्यक्ती पंचायत समितीचे सही शिक्के वापरतो याला काय म्हणावे? कल्याण पंचायत समितीचा किती भोंगळ कारभार सुरू हे लक्षात येते. या विरोधात रायते ग्रामपंचायतीचा माझी कर्मचारी एकनाथ सोनावणे हे तक्रार करतो इतकेच नव्हे तर याचा पाठपुरावा करून केलेली बनावट गिरी समोर आणतो पंरतु गटविकास अधिकारी केवळ टोलवाटोलवी करून तक्रारदाराला चकरा मारायला लावतात. मग तो लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधींना न्याय देण्याची व कार्यवाही करायची मागणी करतो पण तेथे ही निराशाच,
अखेर जिल्हा परिषद, कोकण आयुक्त, मंत्रालय येथे तक्रार केली जाते. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील हे कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांस कारवाई करण्याचे आदेश देतात पण यानंतरही कारवाई होत नाही. यावरुन कल्याण पंचायत समितीच्या कारभाराचा खेळखंडोबा कसा सुरू आहे हे लक्षात येते. त्यामुळे आता परत तक्रारदार एकनाथ सोनावणे यांनी जिल्हा परिषद व मंत्रालय स्तरावर तक्रार दाखल केली आहे. यामध्ये तत्कालीन आस्थापना सांभाळणारे नितीन घोडके, सद्याचे गटविकास अधिकारी श्वेता पालवे आणि मागील बीडिओ डॉ घोरपडे यांची विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी करून यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे.
तर गटविकास अधिकारी पालवे मॅडम यांचे तालुक्यात अजिबात नियंत्रण नाही, कोरोनोच्या संकट काळात यांनी ग्रामपंचायतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे, पावसाळ्याचे नियोजन केले नाही अशा बे जबाबदार आणि बोटचेपी धोरण स्वीकारणाऱ्या अधिका-याची तालुक्यातून हक्कालपट्टी करावी अशी मागणी शिवसेनेचे तालुक्यातील एक मोठे पदाधिकारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे करणार असल्याचे त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.


No comments:
Post a Comment