Thursday, 11 June 2020

"कोरोनाः लॉकडाऊनचे नियम पुन्हा एकदा कडक होणार" ❓❓

"कोरोनाः लॉकडाऊनचे नियम पुन्हा एकदा कडक होणार" ❓❓

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा ऐकला तर याचा अंदाज येऊ शकतो. राजस्थाननेही आपल्या सीमा सीलबंद केल्या आहेत. अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबत विचार केलेला आहे.

कालच उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद बुधवारी झाली. यावेळी मुंबईत बसमध्ये चढताना-उतरताना होणारी धक्काबुक्की, गर्दी यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "जर लोक निर्बंधांचं पालन करत नसतील तर नाईलाजाने राज्यात लॉकडाऊन वाढवावं लागू शकतं.

लॉकडाऊन पुन्हा करण्यात येईल का? लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेली शिथीलता रद्द करण्यात येणार आहे का? या प्रश्नांचं उत्तर सर्वांनाच हवं आहे.

लॉकडाऊनबाबत अनेक मेसेज व्हायरल झाले होते. पण सरकारने वेळोवेळी हे मेसेज खोटे असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. पण पुढे घडलं वेगळंच.

मार्च महिन्यात व्हॉट्सअॅपवर एक ऑडिओ मेसेज शेअर केला जात होता. यामध्ये देशात लॉकडाऊन लावण्यात येईल, असं सांगितलं होतं. पीआयबीने याबाबत स्पष्टीकरण देताना 15 मार्चला एक पोस्ट लिहिली. त्यांनी हा ऑडिओ मेसेज खोटा असल्याचा दावा केला होता.

पुढे याच्या चार दिवसांनंतरही पुन्हा एकदा पीआयबीने लॉकडाऊन करण्यात येईल, अशा चर्चा अफवा असल्याचं सांगितलं.

पण त्यानंतर काही दिवसांनीच 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली होती.

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी पहिल्या लॉकडाऊनदरम्यान केलेल्या वक्तव्यानंतरही असंच काहीसं झालं.

सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सध्या तरी नाही, असं ते 30 मार्च रोजी म्हणाले होते.

पण त्यानंतर लॉकडाऊन एक-दोन नव्हे तर तीन वेळा वाढवण्यात आला. सध्या हा लॉकडाऊनचा पाचवा टप्पा आहे.

लॉकडाऊनचा पहिला टप्पा 25 मार्च, दुसरा टप्पा 15 एप्रिलपासून, तिसरा टप्पा 4 मे तर चौथा टप्पा 18 मेपासून सुरू झाला होता. सध्याचा पाचवा टप्पा 1 जूनपासून सुरू झालेला आहे. पण याला लॉकडाऊन-5 ऐवजी अनलॉक-1 म्हटलं जात आहे.

सध्याचं लॉकडाऊन वाढवण्यात येईल किंवा नाही, आणखी कडक केलं जाईल किंवा नाही याबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत. अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. पण सध्यातरी याचं उत्तर मिळणं अवघड आहे

'Reality Check'
------------------------

सदर परस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मध्यंतरी अशा प्रकारचे काही मेसेजही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये 15 जूनपासून लॉकडाऊन वाढवण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं.

परिस्थितीचं गांभीर्य पाहून भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने हा मेसेज खोटा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

No comments:

Post a Comment

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!! उरण दि २, (विठ्ठल...