Friday, 26 June 2020

"मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरीकांकडून गेल्या दोन दिवसात पालिकेने केला १ लाख ३५ हजारांचा दंड वसूल !"

"मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरीकांकडून गेल्या दोन दिवसात पालिकेने केला १ लाख ३५ हजारांचा दंड वसूल !"


कल्याण - कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी महापालिका क्षेञात राहणा-या नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेह-यावर मास्‍क, रूमाल परिधान न केल्‍यास ते नागरिक ५०० रूपये दंडास पाञ असतील असा आदेश यापूर्वीच महापालिकेने निर्गमित केला होता. 


महापालिका क्षेत्रात स‌दयस्थितीत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे व नागरिक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळुन आल्‍यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार चेह-यावर मास्क न लावणाऱ्या  व्यक्तींविरुध्द सर्व प्रभाग क्षेत्रात जोरदार मोहिम उघडण्यात आली.

त्यानुसार अ प्रभागात मास्क परिधान न करणाऱ्या लोकांकडून रू.7000/-, ब प्रभागात रू.67500/-, क प्रभागात रु.19950/-, ड प्रभागात रु.14500/-, जे प्रभागात रु.8000/-, फ प्रभागात रु.18000/-, आणि आय प्रभागात रु.500/-, असा एकुण रु.1,35,450/- इतका दंड गेल्या दोन दिवसात संबंधीत प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी तेथील स्थानिक पोलिस स्टेशनच्या सहकार्याने वसुल केला आहे.

यापुढेही हि मोहिम अशीच पुढे चालू ठेवणेबाबत निर्देश पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिले आहेत. 

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...