Friday, 26 June 2020

"प्रभाग ५७ जांभिवली ठाकूरपाडा या आदिवासी भागाकडे अंबरनाथ प्रशासनाचे दुर्लक्ष"!

"प्रभाग ५७ जांभिवली ठाकूरपाडा या आदिवासी भागाकडे अंबरनाथ प्रशासनाचे दुर्लक्ष"!


अंबरनाथ :-अरूण ठोंबरे,
अंबरनाथ शहरात आनंदनगर औद्योगिक क्षेत्राच्या अंतर्गत प्रभाग ५७ जांभिवली ठाकूरपाडा येतो. या पाड्यत एकूण 70 आदिवासी कुटुंब राहतात. फ़क्त या गावाची लोकसंख्या 280च्या आसपास आहे. नगरसेवक, लोकप्रतिनिधी, व आमदार फ़क्त निवडणूका जवळ आल्या की यांची आठवण काढतात. कारण पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अरूण ठोंबरे व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अण्णा पंडित यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता या लोकांची होणारी परवड बघून प्रशासनाने केलेल्या दुर्लक्ष कडे लक्ष वेधले.


अंबरनाथ नगरपालिका अति.मुख्याधिकारी  डॉ धीरज चव्हाण याना निवेदन देऊन तातडीने दखल घेण्यासाठी विनंती केली आहे. कारण पावसाळा सूरू झाला असून या पाड्यत जाणारा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला अडचणीला सामोरे जावे लागतआहे. कोणतीही मोठी गाडी या ठिकाणी जाऊ शकत नाही.वीजेचे ट्रान्सफमर धोकादायक असून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत  नाही. तरी तातडीने याबाबत निर्णय घेऊन उपाययोजना करावीअशी विनंती केली आहे. यावेळी महेंद्र तथा अण्णा पंडित प्रदेश-सरचिटणीस, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य.यांनी निवेदन सादर केले त्यांचे सोबत पत्रकार अरुण ठोंबरे (संपादक श्री साम्राज्य) , बारकु रामा उघडे.किशोरी पाटील  (आदिवासी विकास परिषद) इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...