"बदलापुरमध्ये पालिकेला मिळालेल्या निधीचा तातडीने उपाय योजना करण्याची मागणी." *संभाजी शिंदे*
बदलापूर :-अरूण ठोंबरे
कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना ग्रस्तांची संख्या ही झपाट्याने वाढत असून सद्यस्थितीत 649 इतकी कोरोना ग्रस्तांची संख्या झाली आहे, पैकी 311 पेशंट हे विविध ठिकाणी उपचार घेत आहेत ,असे असताना दररोज कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयांच्या छळाला देखील सामोरे जावे लागत आहे ,महाराष्ट्र शासनाने कुळगाव बदलापूर नगरपालिकेला सात कोटीचा निधी मंजूर केला आहे या निधीतून तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज असल्याचे श्री संभाजी शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे ,सध्याच्या परिस्थितीत केवळ सोनिवली येथिल बीएसयुपी येथे केवळ दीडशे पेशंटची व्यवस्था होऊ शकेल अशी परिस्थिती असुन अजुन दोनशे बेडची गरज असुन ,या ठिकाणी ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर ची कुठलीही व्यवस्था नाही या गोष्टी लक्षात घेऊन कारमेल शाळेसमोरील इंदोर स्टेडियम मध्ये तातडीने सर्व सोयीयुक्त ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सह शंभर बेडचे ccc कोरोना सेंटर चालू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी संभाजी शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाला केली आहे त्याचप्रमाणे ऊल्हासनगर शहरातील साई प्लॅटिनिअम हॉस्पिटलच्या धर्तीवर कुळगाव बदलापूर शहरातील चामटोली सापे गाव येथील डिटेक्टेड कॅन्ड सेंटर ज्या ठिकाणी ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर ची व्यवस्था आहे सदर हॉस्पिटल पालिकेने तातडीने ताब्यात घेऊन त्याठिकाणी शहराच्या शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची व्यवस्था करण्यात यावी अशी देखील मागणी श्री संभाजी शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे ,सदर बाबी तातडीने करणे गरजेचे असून याबाबत योग्य तो निर्णय तातडीने घ्यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शहरातील मच्छी मार्केट भाजी मार्केट तसेच रस्त्यावरील फेरीवाले यांच्या कडुन सकाळी कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सचे पालन केले जात नाही त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने सोशल डिस्टन्सचे पालन होण्यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात तसेच कुळगाव बदलापूर शहरात गर्दीच्या ठिकाणी काही चौकाचौकांमध्ये पाण्याच्या टाक्या बसवून त्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅन्ड वॉश लिक्विड सह नागरिकांचे हात धुण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी त्याचप्रमाणे कुळगाव बदलापूर नगरपालिका 16 बी आय ओ टॉयलेट बाबत खरेदी प्रक्रिया पूर्ण केलेली असताना व पालिकेकडे 5 बी आय ओ टॉयलेट प्राप्त झालेले असताना आरोग्य अधिकारी आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे सदर बी आय ओ टॉयलेट हे येथे सडून पडलेले आहेत तरीही या सर्व बी आय ओ टॉयलेट उभारणी तातडीने करण्यात यावी त्याचप्रमाणे कुळगाव बदलापूर शहरातील हॉटेल चालकांशी संवाद साधून होम कोरनटाईनच्या धर्तीवर हाॅटेल रूम पालिकेने ताब्यात घेऊन बदलापूर शहरात होम कोरनटाईन सेंटर चालू करण्यात यावे त्याचप्रमाणे मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे विभागस्तरावर फिवर क्लिनिक चालू करण्याची प्रक्रिया अद्याप चालू झालेले नाही त्यामुळे छोटे छोटे ताप थंडी चे आजार असलेल्या नागरिकांना प्राथमिक उपचार घेता येत नाहीत त्यामुळे थोडा ताप खोकला असल्यास नागरीक कोरोनाच्या भीतीने घाबरून जात आहेत तरीही ह्या क्लिनिक तातडीने चालू करणे बाबत तात्काळ कार्यवाही व्हावी अशा प्रकारचे निवेदन श्री संभाजी शिंदे यांनी बदलापूर नगर पालिका प्रशासनाला दिले आहे,

No comments:
Post a Comment