Tuesday, 23 June 2020

कर्जत तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या अंपग मुलाला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, कल्याण ग्रामीण मनसैनिक धावले मदतीला!

कर्जत तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या अंपग मुलाला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, कल्याण ग्रामीण मनसैनिक धावले मदतीला!


कल्याण (संजय कांबळे)" एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ "या ओळी प्रमाणे मदत करण्यासाठी, किंवा कोणालाही आधार देण्यासाठी जातपात, भेद पक्ष, गरिब श्रीमंत, उच्च निच असे कोणतेही बंधन आड येता कामा नये. नेमके यांचेच ताजे उदाहरण कल्याण तालुक्यातील मनसैनिकांनी समाजासमोर ठेवले आहे
मागिल आठवड्यात राज्यावर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटात कर्जत तालुक्यातील हुमगाव ग्रामपंचायत हद्दीतील ब्रिटिश सरकार विरोधात लढणाऱ्या वीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांच्या आझाद दस्ता मधील स्वातंत्र्य सैनिक कै रामू मन्या कातकरी यांचा अंपग मुलगा आण्णा कातकरी यांचे घरावरील पत्रे पुर्ण पणे उडाले. आज ते बेघर झाले असताना शासकीय यंत्रणेने पंचनाम्याचा सोपस्कार उरकला पण अद्यापही मदत मिळाली नाही. पण याची वाट न बघता कल्याण तालुक्यातील मनसैनिकांनी यांची भेट घेऊन त्यांना पत्रे, दरवाजा, पाईप आणि त्यांची राहण्याची सोय केली त्यामुळे हे नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत पण याहूनही दुर्दैवी बाब म्हणजे हे स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज आहेत. असे पत्र किंवा दाखला मिळवण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयात कित्येक महिन्यापासून चकरा मारत आहेत. हे संताजनक आहे.
ब्रिटिश सरकारच्या काळात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे क्रातीकारकांचे, स्वातंत्र्यवीरांचे केंद्र बनले होते ते येथील घनदाट जंगल आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भलेमोठे डोंगरावर मिळणारा नैसर्गिक आश्रय, ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढणाऱ्या प्रमुख स्वातंत्र्यवीरांपैकी आघाडीवर होते ते वीर भाई, कोतवाल आणि हिराजी गोमा पाटील हे बापलेख, यांच्या सह वाड्या वस्त्या, डोंगर द-यात राहणारे आदीवाशी कातकरी हे देखील यांना शक्य ती मदत करित होते. यांचा गट आझाद दस्ता नावाने ओळखला जात होता देशात इंग्रजांच्या विरोधात वातावरण तापत होता. त्यावेळच्या अलिबाग कुलाबा जिल्ह्यातील ठाणे, माथेरान आणि मुरबाड येथे वीरभाई कोतवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बंड केले होते. विजेच्या तारा तोडणे, खांब उखडून टाकने, रस्ते बंद पाडणे अशी कामे करून ब्रिटिश सरकारची झोप उडवली होती. त्यामुळे यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा मुरबाड मधील सिध्दगड येथे दाखल झाला. लपून बसलेल्या क्रातीकारकांचे वर गोळीबार करण्यात आला. यामध्ये वीरभाई कोतवाल जागीच शहिद झाले इतरांना वेगवेगळ्या ठिकाणी पकडण्यात आले गोमा रामा पाटील, हरि नारायण देशमुख, धोंडू केशव देसाई, भास्कर तांबट आणि इतर 28 जणा विरोधात कुलाबा अलिबाग जिल्हा न्यायालयात खटला भरला. यामध्ये प्रवर्ग एक, दोन, तीन, आणि चार असे पाडण्यात आले यातील शेवटच्या प्रवर्गात बाबू क्षीरसागर, लक्ष्या मन्या कातकरी, रामा मन्या कातकरी धोंड्या लक्ष्या कातकरी दत्तात्रय दमणे यांची नावे आहेत. कर्जत पोलीस ठाण्यात हुमगाव तक्रार नोंदणी क्रमांक 105 /1942 अशी नोंद आहे इतर वीरांची कासेगाव गोरेगाव, डोणे, ढवळ्याचा पाडा, देवळाली या गावाच्या नोंदी कल्याण तालुका पोलीस ठाणे आहेत.


वरिल सर्व इतिहास मांडण्यामागील उद्देश इतकाच की याच याच कै रामा मन्या कातकरी यांचा मुलगा तोही अंपग असलेल्या  आणा कातकरी याचे हुमगाव ता कर्जत येथील घरांचे सर्व छप्पर निसर्ग चक्रीवादळाने उडाले आहे. सरकारी बांबूनी 'पंचनाम्याचा "सोपस्कार उरकला पण अद्यापही या स्वातंत्र्याच्या युध्दात आहुती दिलेल्या वीरांच्या पुत्राला उघड्यावर रहावे लागते हे लाज वाटणारे नाही का? हा सर्व प्रकार येथील निवृत्त शिक्षक बागडे गुरुजी यांनी चित्रीत करून सर्वाना मदतीचे आवाहन केले. हे बघून कल्याण ग्रामीण मनसे तालुका प्रमुख अश्विन भोईर, विवेक गंभीरराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन या स्वातंत्र्य वीरांच्या पुत्राला पत्रे, दरवाजा, पाईप आणि इतर आवश्यक साहित्य देऊन त्यांचे घर दुरुस्ती होईपर्यंत इतर ठिकाणी राहण्याची सोय केली. हे नक्कीच आपल्या शासकीय उदासीनता दाखविणा-याच्या डोळ्यात अंजन घालणारे काम आहे.
याही पेक्षा संतापजनक व दुर्दैवी बाब म्हणजे यांचे वंशज स्वातंत्र्यवीर होते असा दाखला किंवा सरकारी "कागुद" मिळविण्यासाठी या आण्णा कातकरी अंपगाला कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत.
प्रतिक्रिया "आमच्या हुमगाव ग्रामपंचायत हद्दीत आणा कातकरी हे स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज राहत आहेत त्यांचे घराचे नुकसान झाले आहे. त्यांना स्वातंत्र्य सैनिक दाखला मिळण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहे" - श्रीमती अनुजा अंयकर, ग्रामसेविका.
2)"आण्णा कातकरी हे कै रामा मन्या कातकरी यांचा मुलगा आहे. परंतू त्यांच्याकडे कोणताही शासकीय पुरावा नाही "-श्रीराम ठोंबरे, सरपंच, हुमगाव, ग्रामपंचायत ता कर्जत.
3)"खरेच हे आपल्या सर्वाचेच दुर्दैव म्हणावे लागेल की ऐवढे स्वातंत्र्य सैनिक असताना त्यांचे पुरावे असताना ते आपल्याच गावातील, आपले वंशज आहेत हेच माहीत नाही "एकनाथ देसले (सर) लेखक, दिग्दर्शक, शहिद वीर भाई कोतवाल, मराठी चित्रपट
4)कर्जत तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना या संदर्भात वारंवार फोन केला, वॅटसॅप मॅसेज केला की स्वातंत्र्य सैनिक कै रामा मन्या कातकरी, यांचा अंपग मुलगा आण्णा नमस्कार यांचे घरांचे नुकसान झाले आहे, पण या महाशयांनी फोन रिसीव केला नाही.
बघा काय अवस्था आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांची, काय म्हणावे या व्यवस्थेला! 

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...