Saturday, 13 June 2020

"श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला यश" आदिवासी बांधवांना मिळाले हक्काचे रेशनिंग कार्ड !!

"श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला  यश"
आदिवासी बांधवांना मिळाले   हक्काचे रेशनिंग कार्ड  !!


मुरबाड (मंगल डोंगरे ) कोरोणाच्या पार्श्वभूमीवर  देशात गेले दोन-अडीच महिने  लॉक डाऊन स्थिती होती. याच काळात मुरबाड तालुक्यात रेशनिंगवर  जे धान्य आदिवासींबांधवां करता शासनाने मोफत धान्य म्हणून वाटप करण्याचे ठरविले होते.असे असताना आदिवासींकडे रेशनिंग कार्ड नसल्याकारणाने त्यांना मोफत धान्य मिळत असतानाही  त्यांच्या वर कार्डविना उपासमारीची वेळ ओढवली होती. त्यावेळी मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवा करिता वेळोवेळी धावून येणारी श्रमजीवी संघटनेने  यावेळी योग्य  पाऊल उचलून आदिवासींना हक्काचे मोफत रेशनिंग कार्ड  मिळवून देण्याकरिता मागील काही दिवसापूर्वी मुरबाड तहसिलदार कार्यालयावर आंदोलन केले होते.त्या आंदोलनाची दखल घेऊन आदिवासीना मोफत धान्य देण्याचे  शासनाने आदेश काढले असल्याने  बहुतांशी ग्रामीण भागात खेडोपाड्यातील आदिवासी बांधवांना त्याचा लाभ आज प्रत्यक्षात मिळाला असुन       आज  मुरबाडचे   तहसिलदार अमोल कदम यांनी दिलेल्या आदेशावरून तहसिल पुरवठा अधिकारी मनीषा फटाले कर्मचारी मानसी तेलवणे, मदन वाघचौडे यांच्या हस्ते श्रमजीवी संघटना मुरबाड तालुका सचिव पंकज वाघ यास कडे सुपूर्द केले. या वेळी तहसीलदार अमोल कदम,पुरवठा अधिकारी मनीषा फटाले यांचे संघटनेच्या वतीने पंकज वाघ यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...