निसर्ग चक्रीवादळामुळे ओढावलेल्या बिकट परिस्थितीतील श्रीवर्धन तालुक्यातील गरजवंत कुटुंबीयांना कल्याण येथील नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचा मदतीचा हात. !!
संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट व लॉकडाऊन यामुळे सर्व सामान्य, गरीब कुटुंबावर अत्यंत कठीण परिस्थिती ओढवली होती त्यावेळी कल्याण येथील नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यांचे मोठे बंधू व मार्गदर्शक गजानन पाटील व सहकारी यांच्या सोबत संपूर्ण लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या गोरगरीब व गरजवंत कुटुंबाकरीता अनेक सामाजिक उपक्रम भाजीपाला वाटप, अन्नधान्य (तांदूळ, तेल, तुरडाळ,चनाडाळ, तिखट मसाला, मीठ, पीठ, पोहे, कांदा, बटाटा,लसूण इत्यादी) वाटप, पुलाव, पुरी भाजी, आर्सेनिक अल्बम;३० औषधाचे घरोघरी वाटप राबवून २५०० हजार कुटुंबांना आधार दिला.
याच काळात निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसला व त्या भागात प्रचंड नुकसान झाले. अनेक परिवार बेघर झाले, व तेथील नागरिकांची परिस्थती हलाखीची व बिकट झाली आहे. नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांना त्यांचे मित्र अॅडव्होकेट भावेश पाटील यांनी श्रीवर्धन तालुक्यातील भवायह परिस्थिती सांगितली लोकांची उपासमार होत आहे हे ऐकून सामाजिक भान असलेले, नेहमीच गोरगरिबांबद्दल विचार करणारे दानशूर व्यक्तीमत्व ज्ञानेश्वर पाटील यांनी लगेच आपले मार्गदर्शक भाऊ गजानन पाटील यांच्याशी चर्चा करून श्रीवर्धन तालुक्यातील गरजवंत कुटुंबाकरीता मदतीचा हात पुढे केला व संपूर्ण जीवनावश्यक वस्तूंचा (तांदूळ, तेल, तुरडाळ, चनाडाळ, तिखट मसाला, मीठ, पीठ, पोहे, कांदा, लसूण, इत्यादी) पुरवठा केला. यावेळी त्यांचे सहकारी प्रकाश सोनावले, सचिन बुटाला, सचिन भोईर, रवी भोईर, उन्मय पाटील उपस्थित होते.




No comments:
Post a Comment