Monday, 15 June 2020

दिपकभाऊ निकाळजे सामाजिक संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वतीने दलित हत्याकांडाचा निषेध !!

दिपकभाऊ निकाळजे सामाजिक संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वतीने दलित हत्याकांडाचा निषेध !!


देश स्वतंत्र होऊन ७३ वर्षे होत आली तरीही समाजातील काही लोकांच्या विचार सरणीत काही फरक पडला नाही असा प्रत्यय वारंवार येतो अशाच दोन घटना या पुरोगामी महाराष्ट्रात घडल्या यात दोन निष्पाप तरुणांचे बळी गेले. 


दिपकभाऊ निकाळजे सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांनी या घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व स्वत: पिंपरी-चिंचवड येथे पिडीत जगताप कुटुंबीयांची भेट घेतली.

याच पार्श्वभूमीवर दिपकभाऊ निकाळजे सामाजिक संघटनेचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष योगेश गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष धर्माजी वक्ते, जिल्हा अध्यक्ष युवक सुमित माने, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश बर्वे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष अशोक लिहितकर, महिला जिल्हाध्यक्षा शालिनीताई भोंडगे (RPI), मंगेश वाघमारे यांनी मा. तहसीलदार, कल्याण यांना निवेदन देऊन "अरविंद बनसोडे व विराज जगताप" यांच्या हत्याकांडाचा निषेध केला व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...