Thursday, 11 June 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग श्री स्वप्नील अशोक रोकडे याचा रक्तदान शिबिर करून अनोखा वाढदिवस साजरा !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग श्री स्वप्नील अशोक रोकडे याचा रक्तदान शिबिर करून अनोखा वाढदिवस साजरा !


कल्याण आदर्श भालेराव,
माणसाच्या आयुष्यातला सर्वांत मोठा दानधर्म म्हणजे रक्तदान असे म्हटले जाते. अपघात किंवा अन्य विविध कारणांमुळे रूग्णांना रक्‍तपिशवीची आवश्‍यकता भासते. सध्या कोरोनाकाळात रक्तसाठा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. येथील जिल्हा रुग्णालयात जास्त रक्तसाठा ठेवण्या क्षमता नाही. त्यामूळे रक्तदान शिबीर घेण्यात येते. 
        स्वप्नील अशोक रोकडे याच्या वाढदिवसानिमित्त कल्याण तालुक्यात कोरोना च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना रुग्णाची परिस्थिती पाहता  होणाऱ्या अपुरा रक्त पुरवठा लक्षात घेता स्वप्नील रोकडे यांनी त्याच्या वाढदिवसा निम्मित रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 
     रक्तदान काळची गरज आहे.  विविध स्तरावरील संस्था व वैयक्‍तिक दात्यांच्या सहकार्याने रक्‍तपेढ्यांकडून रक्‍त संकलीत केले जात असले तरी सध्यास्थितीत मागणीपेक्षा उपलब्धता कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने  जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्नील रोकडे यांच्या आदेशाने  कल्याण तालुक्यात  रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
साधारणतः प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात पाच लिटर रक्त असते. रक्तदानात केवळ साडेतीनशे मिली एवढेच रक्त घेतले जाते. रक्तदान म्हणून प्रचार आणि प्रसार जरी झाला असला तरी मुळात रक्तदात्यांची संख्या खूप कमी आहे. आपण कितीही प्रगत असलो तरी कुणालाही कृत्रिम रक्त तयार करता आलेले नाही. अपघातातील रूग्ण, प्रसुतीकाळ, अतिदक्षता विभाग यांना जास्त प्रमाणात रक्त लागते. त्यांना वेळेवर रक्त मिळाले नाही तर मृत्यूदेखील होऊ शकतो. यासाठी सर्वांनी एक सजग नागरिक म्हणून रक्तदान करावे पाहिजे, असे आवाहन  जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्नील रोकडे यांनी केले आहे.
जिल्हा  कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग कल्याण डोंबिवली
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रोहीत दादा पवार विचार मंच श्री स्वप्निल अशोक रोकडे यांनी लॉकडाऊन च्या काळात जेवण धान्य वाटप करत असताना कोरोना च्या या काळात रक्त ची खूप आवश्यक गरज आहे असे लक्ष्यात येता   रक्तदान शिबीर चे आयोजन करून आपली सामाजिक माणुसकी जोपासली आहे 
स्वप्नील रोकडे यांच्या विनंती वरून कल्याण तालुक्यात शेकडो लोकांनी रक्तदान करून स्वप्नील रोकडे याचा  अनोखा वाढदिवस साजरा केला. 
राज्यातील वाढत्या रक्तसाठ्यातील तुटवड्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व  प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरात सोशल डिस्टंसिगचे सर्व नियम पाळून आपण आपली जबाबदारी पार पाडण्यात आली 
                                 
गिरिश लाडकर /संदेश रोकडे /अनिरुद्ध अहिरे /प्रमोद पाठारे /गौरव उमाळे /आकीब शेख /सोहेल कुरेशी /स्वप्निल पालवे /आकाश गोऱ्हेर / इम्रान खान / भूषण बचाव / गिरीश सावंत / विनोद वानखेडे / सुशांत माळी / रोहन माळी / आदर्श बिचकल / सुरेश नायर /आशिष सिंग /    यश हेगडे / हेमंत गायकवाड /  विशाल काळे / नईम खान / अभिषेक नायक / गोविंदा पाटील /विनय सिंग /अमोल सरोदे /जय पटनी / शिवेंश सिंग / गणेश राजपूत / तृषात   गराडे / नईम खान /आदर्श बिचकल /प्रशांत निकम /डॅनी /   यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले  आहेत. 
रक्तदान करणाऱ्या दानशुराना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हाकार्याध्यक्ष तथा रोहित दादा पवार विचार मंच तर्फे सन्मानित प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे .
 त्याच्या बरोबर स्वप्नील रोकडे याच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी
प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस - महेश तपासे/ जिल्हाअध्यक्ष - रमेश हनुमंते / सोशल मीडिया Ncp - समीर गुधाते / जिल्हा सरचिटणीस  - श्रीरंग भोसले / प्रदेश सचिव समीर वानखेडे /  जिल्हा उपाध्यक्ष - वासिम शेख / बाळू मामा सांगळे /गिरीश लाडकर / संदेश रोकडे / गौरव उमाळे / इमरान खान / अनिरुद्ध अहिरे / आशिष सिंग / यश हेगडे / सुरेश नायर / भूषण बचाव / गिरीश  सावंत / अभिषेक नायक / प्रमोद पाठारे /आकीब शेख हे सगळे कार्यकर्ते आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!! उरण दि २, (विठ्ठल...