Saturday, 6 June 2020

चक्रीवादळानंतर कल्याण पंचायत समितीची पावसाळ्याअगोदर वादळी सभा संपन्न!

चक्रीवादळानंतर कल्याण पंचायत समितीची पावसाळ्याअगोदर वादळी सभा संपन्न!

कल्याण (संजय कांबळे) एक दोन महिन्याच्या लाॅकडाऊण नंतर आणि नुकत्याच येवून गेलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर आज कल्याण पंचायत समितीची मासिक सभा विविध प्रकारच्या विषयावर वादळी झाली. यावेळी अनेकानी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.


कल्याण तालुक्यात अजून तरी कोरोनाचे फार मोठे संकट नाही. गेल्या दिड ते दोन महिन्यापासून राज्य लाॅकडाऊण आहे. परंतू राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लाॅकडाऊण मध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे आज कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती रंजना देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. नुकतेच कल्याण तालुक्यावर निसर्ग चक्रीवादळाने घाला घातला होता. त्या अनुषंगाने आजची सभा वादळी ठरली. प्रथम ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी विभागाचे सभापती किशोर जाधव यांनी कल्याण पंचायत समिती ला भेट दिली त्यांचे स्वागत केले
यांनतर मात्र माझी सभापती व सदस्य दर्शना जाधव यांनी ग्रामसेवकावर कडाडल्या, त्यांच्या कामगाजावर व मनमानी कारभार कडाडून टीका केली. करोनाच्या संकटात तसेच लाॅकडाऊण काळात अनेक ग्रामसेवक कार्यालयात आले नाहीत असा आरोप केला. तर या सुरात सूर मिळवत सदस्य भाऊ गोंधळे व माझी उपसभापती पांडुरंग म्हात्रे यांनी त्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. तर या संकट काळात मुख्यमंत्री सहायत्ता निधीस मदत न करता पी एम निधीस मदत केल्यावरून सदस्य रमेश बांगर आणि भाऊ गोंधळे यांनी सभागृह दणाणून सोडले.
यांनतर माझी सभापती भारती टेंभे यांनी विद्यूत मंडळांच्या गैरकारभाराचे वाभाडे काढले. त्यांच्या मनमानी कारभारामुळे जनता वैतागली असल्याचे सांगितले. तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची मनमानी सभागृहात मांडली. याविषयी सभापती रंजना देशमुख यांच्यासह सर्वच सदस्यांनी विद्यूत मंडळांच्या पाटील नामक अधिका-याची हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर केला असल्याचे सांगितले. यावेळी कृषी, शिक्षण, आरोग्य, बालविकास, आदी विभागाच्या खातेप्रमुखांनी आपआपल्या विभागाची माहिती दिली यावेळी सभापती रंजना देशमुख, उपसभापती दळवी, सर्व सदस्य, सदस्या आणि सर्व विभागाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. आजच्या वादळी बैठकीवरुन एकच अर्थ निघतो की गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांचे कल्याण पंचायत समितीच्या प्रशासनावर नियंत्रण राहिले नाही. तसे अनेकानी खाजगीत बोलूनही दाखवले. 

No comments:

Post a Comment

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ; उरण मधील बाजारावर परिणाम !!

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ;  उरण मधील बाजारावर परिणाम !! ** व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची भीती. उरण दि ...