Thursday, 18 June 2020

"कोणतीही अट न घालता प्रसिद्ध माध्यमातील सर्व कर्मचाऱी यांना रेल्वे प्रवास उपलब्ध करण्यात यावा"!

"कोणतीही अट न घालता प्रसिद्ध माध्यमातील सर्व कर्मचाऱी यांना रेल्वे प्रवास उपलब्ध करण्यात यावा"!


                
मुंबई, सिध्दांत गाडे  -  कोणतीही अट न घालता प्रसिद्ध माध्यमातील सर्व कर्मचाऱी यांना रेल्वे प्रवास उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस, महाराष्ट्र अध्यक्षा शितलताई करदेकर यांनी केली आहे.

कोणतीही अट न घालता अटी न घालता प्रसिद्ध माध्यमातील सर्व कर्मचाऱी ( छोटे, मोठे, साप्ताहिक, दैनिक, यु ट्युब, या इतर कोणत्याही मार्गाने प्रसिद्धी माध्यमातून जनजागृती करणारे ) यांना मिळावा अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस, महाराष्ट्र अध्यक्षा शितलताई करदेकर यांनी केली आहे.
१५ जून पासून अत्यावश्यक सेवेतील जसे सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी, मंत्रालय, बेस्ट राज्य शासन, केंद्र शासन, सरकारी किंवा खासगी हॉस्पिटल, मुंबई ‌पोलिस या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लाइफ लाइन लोकल ट्रेन सुरु करण्यात आली, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल आदि सर्व जिल्ह्यांना जोडणारे प्रवासाचे मुख्य साधन रेल्वे,  महानगरपालिकांच्या बसेस किंवा एसटी यापेक्षा सुरक्षित व जलद, सहजसोपा प्रवासाचे साधन रेल्वे.....

अत्यावश्यक सेवेत प्रसार माध्यमे व यातील कर्मचारी तसेच पत्रकार सुध्दा येतात यांनी सुध्दा संपूर्ण कोरोनाचे आलेले संकट व लॉकडाऊनच्या काळात (अत्यंत जोखमीच्या वेळी) लोकांपर्यंत सरकारी आदेश तसेच सरकार करत असलेल्या उपाययोजना, जनजागृती, धीर देण्याचे काम केले. आज कोरोना विरुद्धच्या लढाईत आरोग्य कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी, सरकारी कर्मचारी, यांच्या सोबत प्रसार माध्यमातील पत्रकार व कर्मचारी यांचे सुध्दा खूप मोठे योगदान आहे, तरी पत्रकार व कर्मचारी यांना रेल्वेत प्रवास नाकारून तुम्हाला आत प्रवेश करता येणार नाही असे सांगण्यात येत आहे.

म्हणून नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस, महाराष्ट्र अध्यक्षा शितलताई करदेकर यांनी मा. रेल्वेमंत्री मुंबईचे असल्याने व मुख्यमंत्री यांनी दैनिक सामनाचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे त्यामुळे त्यांना स्वतःला पत्रकारांची जाणिव असल्याने या रेल्वे, लोकल सेवेचा लाभ अधिस्वीकृती धारक, मोठ्या बॅनरचे किंवा चॅनलचे पत्रकार, कर्मचारी अशा अटी न घालता प्रसिद्ध माध्यमातील सर्व कर्मचाऱी ( छोटे, मोठे, साप्ताहिक, दैनिक, यु ट्युब, या इतर कोणत्याही मार्गाने प्रसिद्धी माध्यमातून जनजागृती करणारे ) यांना मिळावा अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस, महाराष्ट्र अध्यक्षा शितलताई करदेकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...