Thursday, 18 June 2020

पत्रिपुल ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुला होणार -खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी घेतला कामाचा आढावा !

पत्रिपुल ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुला होणार -खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी घेतला कामाचा आढावा !


कल्याण, अभिजित देशमुख : कल्याण पूर्व पश्चिम जोडणारा आणि वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा असलेल्या कल्याणच्या पत्रीपुलाच्या उभारणीतील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहे त .पत्रिपुल पूर्ण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून येत्या ऑगस्ट अखेर पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रिपुलाच्या कामाचा पाहणी दौरा करत कामाचा आढावा घेतला
       कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासह नवी मुंबई गाठण्यासाठी पत्रीपुल हा महत्वाचा दुवा आहे. ऑगस्ट 2018 पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता तर नोव्हेबर 2018मध्ये या पुलावर हातोडा मारण्यात आला तेव्हापासून पुलाचे काम सुरु असून वाहन चालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा सुरु असून त्यांनी हैद्राबाद मधील कंपनीत जाऊन या पुलाच्या गर्डरची पाहणी केली. तर गर्डरचे आलेले सुटे भाग सुरक्षित ठेवण्यासाठी बाजूच्या सोसायटी मधील रहिवाशांना विश्वासात घेत जागा उपलब्ध करून दिली आहे.  मात्र करोना काळात  सर्वच उद्योग-व्यवसाय, सार्वजनिक कामे सर्व काही ठप्प पडली होती.  परंतु दुसऱ्या लॉकडाऊनमधील काही अटी व शर्तीचे पालन करून हे काम सुरु करण्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यशासनाकडे पत्र व्यवहार करून परवानगी मिळवून घेतली असून 2 एप्रिल पासून काही मोजक्या मजुरांद्वारे कल्याण पत्रीपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे.   बुधवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून सदर ठेकेदार व संबधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कामाचा आढावा घेतला व त्यांना कामासंर्भात योग्य ते निर्देश दिले. यावेळी बोलताना शिंदे यांनी  याकामासाठी कुशल मजुरांची आवश्यकता असल्याने  संबधित ठेकेदाराने विशेष करून पश्चिम बंगालमधून असे मजूर उपलब्ध केले आहे. तसेच पुलाच्या स्तंभाचे काम पूर्ण झाले असून या पुलाच्या ७६.०० मीटर लांबीच्या गाळाचे लॉचिंग करण्याकरिता आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे तसेच गाळ्याचे कामही हैद्राबाद येथे पूर्ण झाले असून सर्व साहित्य पुढील येत्या १० दिवसांमध्ये प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध होईल व पुढील महिन्यापासून लॉचिंग प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्ट अखेर पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.याठिकाणी तिसऱ्या पत्रीपुलाचे कामही जुलै महिन्यापासून सुरु होत असून त्याचे आवश्यक नकाशे व संकल्पने अंतिम झाले असून प्रत्यक्ष काम जुलै महिन्यामध्ये सुरु करून पुढील 1 वर्षाच्या कालावधीत या ही पुलाचे काम पूर्ण होईल व यामुळे कल्याण डोंबिवली मधील नागरिकांना होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले .

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...