कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्तअमित काळे, एमएमआरडीए आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी केला एकत्रित पाहणी दौरा.....
कल्याण, अभिजित देशमुख : कल्याण-शीळ रोडवरील निळजे पूल
धोकादायक ठरवत या पुलावरून होणारी वाहतूक बंद झाल्याने वाहतूक कोंडी मध्ये अधिक भर पडली आहे.त्यामुळे या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी प्रवेश देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. बुधवारी एम.एस.आर.डी.सी ,रेल्वे आणि वाहतूक पोलिसांसोबत आमदार पाटील यांनी पुलाचा दौरा करत, हलक्या वाहनांसाठी पूल वाहतूकीसाठी खुला करता येईल का याची पाहणी केली आणि जड-अवजड वाहनांची वाहतूक कल्याण शीळ-रोडवर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तळोजा मार्गे त्यांना जाण्याचे निर्देश दिले जाईल.
कल्याण शिळ या सर्वाधिक रहदारीच्या मार्गावरील पत्रीपूल नव्याने उभारण्यासाठी बंद करण्यात आला असतानाच आता जीर्ण झालेले निळजे पूल देखील धोकादायक जाहीर करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. यामुळे कल्याण शिळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमालीची वाढली असून वाहन चालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यासाठी या पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश देऊन वाहनचालकांची तात्पुरती डोकेदुखी दूर करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. बुधवारी आमदार राजू पाटील यांनी वाहतूक ,रेल्वे आणि एम.एस.आर.डी.सी.च्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली .त्यावेळी आमदार पाटील यांनी सदर पुलाची तात्पुरती डागडुजी करून पुढील 4 महिने हा पूल हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवावा, अवजड वाहनाची वाहतूक खोणीमार्गे वळवण्यात यावी आदी महत्वाच्या सूचना यावेळी केल्या. त्यावर आयआयटीकडून पुन्हा एकदा या पुलाचा अहवाल तयार करून पुढचा निर्णय घेण्याचं आश्वासन यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी दिले
यावेळी एम.एस. आर.डी.सी.चे कार्यकारी अभियंता बडोळे ,टीम लीडर संतोष गुप्ता वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप उगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ, रेल्वेचे मुंबई डिव्हीजनल अभियंता ए. के.हिवाळे आणि संदीप सिन्ना यांच्या उपस्थितीत पुलाची पाहणी केली आहे.
*आमदार राजू पाटील यांनी केली कोव्हिडं सेंटरची पाहणी*...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात सुरू असलेल्या कोव्हिडं सेंटरच्या कामाचीही आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली.यावेळी लवकरच हे कोव्हिडं सेंटर उपचारासाठी सुरु होणार आहे असे केडीएमसी अधिकारी शैलेश मळेकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment