Thursday, 18 June 2020

कल्याणच्या महावितरण कर्मचाऱ्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे फीडर 48 तासात पूर्ववत !

कल्याणच्या महावितरण कर्मचाऱ्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे फीडर 48 तासात पूर्ववत !


कल्याण, अभिजित देशमुख: अतितीव्र निसर्ग चक्री वादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे फीडर कल्याणच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने 48 तासात सुरु केला. कल्याण परिमंडलातून रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीत मदतीसाठी गेलेले कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. स्वतः मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल या दोन्ही जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात वादळानंतर दहा दिवस नुकसानग्रस्त भागात तळ ठोकून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व मदत करत होते.
      निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यात दापोली उपविभागातील 11 केव्हीचा हर्णे फीडर उद्ध्वस्त झाला होता. वीजवाहिनेचे अनेक खांब जमीनदोस्त व वाकले होते. जवळपास दहा ते अकरा दिवस हा फीडर ब्रेकडाऊनमध्ये होता. कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत कर्मचारी दुरुस्तीच्या कामासाठी या भागात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. कामाला सुरुवात केल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ठिकठिकाणी कोसळलेले झाडे व फांद्या दूर करून पडलेले, वाकलेले वीजखांब पुन्हा उभे केले. तसेच तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर बदलून 48 तासात फिडर दुरुस्त केला. केवळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने या कर्मचाऱ्यांनी फिडरची दुरुस्ती करून हर्णे फीडरवरील ग्राहकांचा वीजपुरवठा 15 जूनला सुरळीत केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व मान्सूनच्या पावसाचा अडथळा यांना सामोरे जात कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या या कामगिरीचे कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता अग्रवाल व कल्याण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी कौतुक करून पुढील कामासाठी प्रोत्साहन दिले आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...