डोंबिवलीत चीनचा राष्ट्रध्वज जाळून निषेध !
कल्याण : लडाखमधील गलवान व्हॅली येथे चीन सैन्याने भारतीय जवानांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा गुरुवारी डोंबिवलीत भाजप युवामोर्चातर्फे निषेध करण्यात आला. डोंबिवली पूर्व मंडलच्या भाजयुमोने चीनचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळून आपला निषेध व्यक्त केला.
यावेळी वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. या आव्हानात्मक प्रसंगी सर्व भारतीय तरुण, भारत सरकार आणि भारतीय जवानांसोबत आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत. चीन असो वा पाकिस्तान, घुसखोरी आणि दहशतवाद ह्याबद्दल आपले झिरो टॉलरन्स हेच धोरण असले पाहिजे, अशी भावना यावेळी भाजयुमोने व्यक्त केली. यावेळी भाजयुमोचे अथर्व ताडफळे, मंदार जोशी, रोहन देसाई राजा सिंघानी, श्रेयस मानकामे, चिन्मय कामतेकर, भूषण देव आदी कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment