Thursday, 18 June 2020

केडीएमटीच्या दहा बसेस प्रवाशांच्या सेवेत !!

केडीएमटीच्या दहा बसेस प्रवाशांच्या सेवेत !!

कल्याण, अभिजित देशमुख : लोकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना वाहतुकीसाठी केडीएमसीच्या 25 बसेस तैनात होत्या .त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर आजपासून सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आणखी 10 बसेस कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अंतर्गत मार्गावर उतरवण्यात आल्या आहेत .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराचे तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करून या बसेस चालविल्या जाणार असून पुढील आदेश मिळेपर्यंत या बसेस चालविल्या जाणार असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहन विभागाकडून  प्रवाशांनी मास्क, सुरक्षित वावराचे नियम पाळून बस मधून प्रवास करावा असे आवाहन   करण्यात आले आहे 
            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊन जाहिर केल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची परिवहन  सेवा देखील बंद करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी केडीएमटीच्या 25 बसेस बदलापूर, टिटवाळा, नवी मुंबई या मार्गावर चालविल्या जात आहेत . आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्या बरोबरच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा देखील सुरू करण्यात आली आहे .तबबल तीन महिन्यानंतर  कल्याण डोंबिवली परिवहनच्या 10 बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत.नागरिकांना ये जा करण्यासाठी पर्यायी साधनांची सोय नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे यामुळेच केडीएमटीने सर्वसामान्य प्रवाशांसाठी 10 बसेस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अंतर्गत मार्गावर या बसेस चालविल्या जाणार असून यामुळे कामावर लोकलने जाणाऱ्या प्रवाशांना घर ते रेल्वे स्टेशन आणि स्टेशन ते घर असा प्रवास करता येणार आहे आजपासून या बसेस सुरू करण्यात आल्या.या बसमधील प्रत्येक सीट वर 1 प्रवासी आणि 5 उभे प्रवासी इतक्याच प्रवाशांना बस मध्ये प्रवेश दिला जाणार आहे तर बस आगारातून निघताना आणि परतल्यावर या बसेसचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी डेपोतील कर्मचार्यवर सोपविण्यात आली आहे .

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...