म्हारळ गाव पुन्हा लाॅकडाऊण, नागराकानो सुधारा अजून वेळ गेलेली नाही?
कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले म्हारळ गाव कोरोनाचा हाॅसस्पाॅट होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अखेर ग्रामपंचायतीने पुढील तीन दिवस म्हारळ गाव पुर्ण लाॅकडाऊण करण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांनी आता तर सुधारावे आणि घरिच राहून सहकार्य करावे असे आवाहन ग्राम प्रशासनाने केले आहे.
कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत आतापर्यंत 17 पेंशंट आढळून आले आहेत. नुकतेच गावात एकाच कुंटूबात 11 रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीची चिंता पसरली आहे. रोज दोन, तीन कोरोना कोव्हीड चे रुग्ण वाढत आहेत.
सरकारच्या लाॅकडाऊण मधील शिथिललतेचा नागरिकांनी गैरफायदा घेतला, भाजीखरेदी असो अथवा किराना दुकाने, चिकन, मटण वाल्याच्या जवळ सोशलडिस्टींग ची ऐसी की तैशी होताना दिसत होती. काही दिवसांपूर्वी तर पेंशंट सापडलेला एरिया शील करण्यावरून मोठा राडा झाला होता. यासर्वावरुन एकच वाटते की लोकांना कोरोना कोव्हीड या महामारीचे गांभीर्य नाही. परंतू आता पाणी डोक्यावरून जाण्याची वेळ आली आहे. म्हारळ, वरप कांबा येथे कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.म्हारळ गावाची तर खूपच वाईट अवस्था झाली आहे. येथील पेशंट ला कोठेही दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना घरीच कोरोनटांइग करण्यात आले आहे.
वरप येथील कोव्हीड केअर सेंटर सुरू व्हायला अजून काही दिवस लागतील तोपर्यंत काय होईल याचा विचार करा. त्यामुळे आता पुढील काही दिवस आपण घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करायला हवे. कारण आपण आता ग्रामपंचायत अधिकारी किंवा कर्मचारी अथवा लोकप्रतिनिधी यांना दोष देऊ शकत नाही. कारण ठाणे, भिवंडी येथे बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे शहाणपणा यांच्यातच आहे की आपण एकमेकाकडे बोट न दाखवता सोशलडिस्टींग चे काटेकोर पालन करुन घरी राहून कोरोनावर मात करुया
कारण अजूनही वेळ गेलेली नाही. घरीच राहूया, कोरोनाला हरऊया! (फोटो आहेत)

No comments:
Post a Comment