"कोरोना लढ्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे मुरबाड मध्ये रक्तदान शिबिर" !!
मुरबाड - { मंगल डोंगरे } देशात आणि राज्यात ओढावलेल्या ख रोना महामारीचा सामना करण्यासाठी ,केवळ सरकारच नव्हे तर सर्व राजकीय सामाजिक संस्था संघटना अहोरात्र जिवाचे रान करून या संकटाचा सामना करत आहेत. कुणी अन्न दान,तर कुणी जिवनावश्यक वस्तुंचे दान करून देशबांधवांच्या जिवाची काळजी घेत आहेत.तर कुठे कुणी रक्तदान करून जिवनदानाचे कार्य करीत आहेत. याच धर्तीवर " कोरोना महामारीच्या भिषण संकटात महाराष्ट्रातील कोवीड रुग्णांना रक्ताचा तुडवडा भासू नये म्हणुन भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील व मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुरबाड मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण , मुरबाड तालुका व शहर यांनी मुरबाड मधील एम.आय. डी. सी. हाॕल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन स्वःताही रक्तदान केले . यावेळी मुरबाड तालुका भाजपा अध्यक्ष जयवंत सुर्यराव ,जिल्हा ग्रामीण चे सरचिटणीस नितीन मोहपे , जेष्ठ नेते अनंता कथोरे,शहर अध्यक्ष सुधिर ( भाई) तेलवणे , नगराध्यक्षा छायाताई चौधरी , माजी नगराध्यक्ष मोहन सासे ,माजी उप सभापती दिपक खाटेघरे,पंचायत समिती सदस्य दिपक पवार ,श्रीकांत धुमाळ मा.सदस्य अनिल घरत , तालुका सरचिटणीस सुरेश बांगर , उपस्थित होते तर हे शिबीर यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चा ठाणे जिल्हा सरचिटणीस जयवंत हरड ,जिल्हा उपाध्यक्ष निलेश पष्टे ,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष हरेश खापरे ,शहर अध्यक्ष मुकेश विशे यांनी विशेष मेहनत घेतली. या शिबिरा मध्ये जवळपास 54 ते 55 रक्तदात्यानु रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले आहे.यावेळी रक्त संकलंन करण्यासाठी अर्पण ब्लड बॕक कल्याण यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment