Monday, 8 June 2020

गोवेली चा पेंशंट ठणठणीत, काळजीपोटी संपर्इकातील लोकांना कोरोनटांइग करणार!

गोवेली चा पेंशंट ठणठणीत, काळजीपोटी संपर्इकातील लोकांना कोरोनटांइग करणार!


कल्याण (संजय कांबळे) कालच गोवेली येथे आढळून आलेला पेशंटचा कोरोना कोव्हीड १९ चा रिपोर्ट पाॅझिटिव आला असला तरी तरी त्यांच्या मध्ये तशी लक्षणे दिसत नसून तो ठणठणीत आहे. परंतू काळजी पोटी याच्या संपर्इकातील लोकांना उद्या कोरोनटांइग करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश राठोड यांनी सांगितले. तर आपण २०/२५ दिवसापूर्वी क्रिकेट खेळत होतो हे खरे आहे पण यांनंतर सुरक्षेसाठी मी खेळलो नाही असे पेंशंटशी संपर्क साधला असता सांगितले त्यामुळे अशा समजदार आणि सुज्ञ पेशंटचे कौतुक आणि अभिनंदन करायलाच पाहिजे अशीच काळजी सर्वांनी घेतली तर कल्याण तालुका कोरोना मुक्त व्हायला वेळ लागणार नाही
मुंबई येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचा कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव आला असला तरी तो ठणठणीत आहे. याच्या मध्ये कोणत्याच प्रकारची कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. कालच दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश राठोड यांनी पेंशंटशी चर्चा करून त्याला पुढील उपचारासाठी भिवंडी येथे पाठविण्यात आले आहे. आपण सतत पेंशंट च्या संपर्कात असून लक्षणे दिसून येत नाही. परंतू सुरक्षेचा उपाय म्हणून घरातील व्यक्तींना सोनिवली बदलापूर येथे कोरोनटांइग करण्यात येणार आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर या बाबतीत पेशंट ला संपर्क साधला असता ते म्हणाले मी एक समजदार नागरिक आहे. २०/२५ दिवसापूर्वी क्रिकेट खेळलो होतो. पण जसे मला समजलं तसे मी स्वतः ची व इतरांची काळजी घेतली. मला मित्र खेळायला बोलवायचे पण मी मुद्दामच दूर राहिलो, माझ्या मुळे इतरांना त्रास नको हेच मी पाहिले
त्यामुळे ख-या अर्थाने कोरोना योद्धा हा पेंशंट असून त्यांनी घेतलेली काळजी नक्कीच कौतुकास्पद आहे. म्हणून असा समजूतदार पणा सर्वानीच दाखवला तर कल्याण तालुका कोरोना मुक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे हा लवकरात लवकर ठणठणीत बरा होऊन घरी परतावा अशी आपण सर्वांनी प्रार्थना करायला काय हरकत आहे.

No comments:

Post a Comment

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ; उरण मधील बाजारावर परिणाम !!

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ;  उरण मधील बाजारावर परिणाम !! ** व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची भीती. उरण दि ...