Tuesday, 16 June 2020

रायते प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून वर्षानुवर्षे वाया जाणारे पाणी अखेर थांबले! पाणीपुरवठा विभागाचे काम!

रायते प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून वर्षानुवर्षे वाया जाणारे पाणी अखेर थांबले! पाणीपुरवठा विभागाचे काम!

कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर असलेल्या रायते पाणी पुरवठा योजनेतून वर्षानुवर्षे वाया जाणारे पाणी अखेर कल्याण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्ती करून रोखले आहे. त्यामुळे पाण्याची बचत झाली आहे.
कल्याण तालुक्यात तीन सरकारी पाणी योजना कार्यरत होत्या यामध्ये रायते प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, दहागाव पाणी पुरवठा योजना आणि खडवली पाणी पुरवठा योजना याचा समावेश आहे. यापैकी खडवली आणि दहागाव या योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या पंरतु रायते पाणी पुरवठा योजना अद्यापही शासकीय योजना म्हणून सुरु आहे.



तालुक्यातील 17 गावे आणि वाड्या वस्त्या साठी सन 1971 साली उल्हास नदीच्या काठावर ही योजना सुरू करण्यात आली. 26 जुलै 2005 च्या महापुरात या योजनेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातून कसेबसे सावरत आज ही योजना एक ते दिड लाख नांगरिकाना" पाणी" पाजत आहे. परंतू साठवण टाकी आणि इनटेक वेल अनेक वर्षेपासून लिकिज होते. यामुळे नदीच्या पात्रातील विहिरीतून पाणी टाकीत व गळतीमुळे तेच पाणी पुन्हा नदित असे सुरू होते. ही बाब कल्याण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे इंजिनिअर गहाणे यांच्या लक्षात आले. त्यांनी या बाबतीत वरिष्ठांना दाखवून हे थांबवून दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार सुमारे 20/25 लाखांचे अंदाज पत्रक तयार करून आज पावसाळ्यापूर्वी नदीच्या पात्रातील विहिरीच्या सर्व बाजूंनी सिंमेट गोण्या टाकून पाणी अडवून या विहिरीतील गळती थांबविली, तसेच साठवण टाकी व इनटेक वेल दुरुस्ती केली. आता तरी पाणी साठवण क्षमता वाढेल आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही अशी आशा व्यक्त करुया




यातून एक प्रश्न पडतो की इतके वर्ष या योजनेवर लाखोंचा खर्च करण्यात आला मग तो नेमका कोठे व कशावर खर्च केला. व ही बाब तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला नाही का? 

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...