महावितरणच्या भोंगळ कारभाराने सासणे गाव दोन दिवस अंधारात * नागरिकांचे मुख्य अभियंत्यांना साकडे.
मुरबाड {मंगल डोंगरे }महावितरण अधिकाऱ्यांचे भोंगळ कारभाराने सासणे येथील नागरिकांना दोन दोन दिवस अंधारात रहावे लागत असल्याने संतप्त नागरिकांनी थेट मुख्य अभियंत्यांना साकडे घातल्याने मुख्य अभियंत्यांचे आदेशाने खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी अवघ्या पंधरा मिनिटात दुरुस्ती चे काम करुन आपण सतर्क असल्याचे वरिष्ठांना भासविले असले तरी या कामचुकार अधिकाऱ्यांचे कारभारा बाबत नागरिकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुरबाड {मंगल डोंगरे }महावितरण अधिकाऱ्यांचे भोंगळ कारभाराने सासणे येथील नागरिकांना दोन दोन दिवस अंधारात रहावे लागत असल्याने संतप्त नागरिकांनी थेट मुख्य अभियंत्यांना साकडे घातल्याने मुख्य अभियंत्यांचे आदेशाने खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी अवघ्या पंधरा मिनिटात दुरुस्ती चे काम करुन आपण सतर्क असल्याचे वरिष्ठांना भासविले असले तरी या कामचुकार अधिकाऱ्यांचे कारभारा बाबत नागरिकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.कोरोना कोविड 19 या महामारी ला सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा हि सतर्क ठेवण्यात आली असुन त्यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना मुख्यालयी वास्तव्य करण्याचे आदेश असले तरी मुरबाड महावितरणचे अधिकाऱ्यांनी आपले घर सोडले नसुन ते मोबाईल द्वारे आपले कर्तव्य पार पाडत असल्याने वेळोवेळी खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे प्रशासनाचे तसेच बँकाचे आँनलाईन होणारे व्यवहार हे ठप्प रहात असुन तासनतास नागरिकांना विज पुरवठ्याची प्रतिक्षा करावी लागत आहे.
तालुक्यातील शहरी ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासह सुमारे 207 गावची जबाबदारी असलेल्या महावितरणे नागरिकांना सुरळीतपणे विजपुरवठा देण्यासाठी तसेच वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर नियंत्रण ठेऊन महावितरणचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये म्हणुन काही किरकोळ दुरुस्त्या करणे तसेच शहरी भागातुन ग्रामीण भागात जंगलातून विजपुरवठा करणारे पोल तसेच तारा बदलणे व लाईनवर आलेली झाडे छाटणे हि कामे पावसाळ्यापुर्वी करण्याचे आदेश असताना व पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीत तसेच वादळात मोठे नुकसान किंवा बिघाड झाल्यास सुरळीतपणे विजपुरवठा करण्यासाठी व या खंडित होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे महावितरणचे आर्थीक नुकसान होऊ नये यासाठी खाजगी एजन्सी नेमणे व त्यांचे मार्फत हि कामे तातडीने करुन घेणे असे वरिष्ठांचे आदेश असताना मुरबाड उपविभागाचे अधिकारी हे शासनाचे आदेश पायदळी तुडवत मुख्यालयी वास्तव्य न करता ते कल्याण डोंबिवली. बदलापूर या ठिकाणी वास्तव्य करतात. त्यामुळे ते विभागिय कार्यालयाचे कामाचे निमित्त करुन कार्यालयात येण्याचे टाळतात व घरिच राहून मोबाईल द्वारे कामे करतात. त्यामुळे क्षेत्रिय कर्मचारी हे देखील आपल्या कार्यक्षेत्रात न जाता ते खाजगी कामांना जास्त पंसती देतात. अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे बेजबाबदारपणामुळे कोठे लहान मोठी दुरुस्ती करायची असल्यास त्याकडे पाठ फिरवली जाते. व नागरिकांना अनेक दिवस अंधारात रहावे लागते.
No comments:
Post a Comment