सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेना भवन जवळपास आठवडाभर बंद राहणार!
संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या आणि देशातही अतिशय झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूची दहशत आता थेट मुंबईतील शिवसेना भवन या वास्तूपर्यंत येऊन पोहोचली आहे. परिणामी सुरक्षेच्या कारणास्तव आणि सावधगिरीचे पाऊल म्हणून पुढील काही दिवसांसाठी मुंबईच्या शिवाजी पार्क येथील शिवसेना भवन बंद ठेवण्यात येणार आहे.
शिवसेना भवनात नेहमी ये-जा असणाऱ्या खासदार अनिल देसाई यांच्या कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाल्याचे कळत आहे. ज्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेना भवन जवळपास आठवडाभर बंद राहणार आहे.
दरम्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांच्या शासकीय सुरक्षारक्षकांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. हे दोघेजण उपचारानंतर कोरोनातून बरे झाले आहेत.

No comments:
Post a Comment