Thursday, 11 June 2020

कोरोना काळात ४६७ सायबर गुन्ह्यांची नोंद; २५५ व्यक्तींना अटक.

कोरोना काळात ४६७ सायबर गुन्ह्यांची नोंद; २५५ व्यक्तींना अटक.

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत.

राज्यात सायबर संदर्भात ४६७ गुन्हे दाखल झाले असून २५५ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.

राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ९ जून २०२० पर्यंत एकूण ४६७ गुन्ह्यांची (ज्यापैकी ३० अदखलपात्र आहेत) नोंद
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९३ गुन्हे दाखल झाले आहेत.

आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी १९० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअरप्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत.
इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्याप्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत

या सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २५५ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

*नाशिक ग्रामीणमध्ये एका गुन्ह्याची नोंद*

नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या विभागातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या १८ वर गेली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिक रंग देणाऱ्या आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केली होती.
त्यामुळे परिसरात अफवा पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!! उरण दि २, (विठ्ठल...