कल्याण स्टेशनच्या समोरील IDBI बॅंकेच्या ATM मधील चोरीच्या गुन्ह्याचे आरोपी तीस तासात अटक.
"पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक".
कल्याण, प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचे देशावर आलेले संकट त्यामुळे गेले अडिच महिने असलेले लॉकडाऊन त्या काळात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन लोकांना सुरक्षित ठेवणे कोरोनाचा फैलाव न होऊ देणे ही खूप मोठी जबाबदारी पोलिसांनी समर्थ पणे हाताळली, तसेच कल्याण येथील महात्मा फुले पोलिस स्टेशन यांच्या अंतर्गत रेल्वे स्टेशन व एसटी स्टॅण्ड सुध्दा येतात महाराष्ट्र सरकारने परप्रांतीय मजुरांकरीता श्रमीक ट्रेन सुरु केल्या त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात मजुरांनी केलेली मोठ्या प्रमाणावर गर्दी त्यांचे केलेले नियोजन त्यात निसर्ग चक्रीवादळामुळे वाढविलेला बंदोबस्त या गोष्टींचा ताण अशाच वेळी रायटर सेफगार्ड प्रा.लि. कंपनीचे ब्रॅंच हेड फिर्यादी राहुल बांदेकर यांनी ५ जून २०२० रोजी रात्री १०.५० वाजता कल्याण रेल्वे स्टेशन समोरील बी. पी. जोशी कंपाऊंड, आभा बिल्डिंग येथील आयडीबीआय बॅंकेचे एटीएम मशिन मधील रक्कम रोख रुपये ४९,०२५००/- पासवर्डचा वापर करून संमतीशिवाय लबाडीने चोरुन नेल्याची तक्रार दाखल केली व पासवर्ड कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांकडे असतो त्यांची नावे एटीएम मशिन ऑपरेटर किरण पंडित व प्रणव मोरे यांची व यांनी पासवर्ड दिलेल्या चेतन हिराळकर व अमर माळी सांगून या चौघांवर संशय व्यक्त केला.
सदर गुन्ह्याचा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अविश्रांतपणे व चिकाटीने पाठपुरावा करून कौशल्यपूर्ण तपास केला असता संशयित किरण जगन्नाथ पंडित,वय-२८, रा. सिध्दार्थ नगर, रामदास वाडी, कल्याण(प) हा गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार असल्याचे व त्याने त्याचे साथीदार जयदिप कांतीलाल पवार, वय-३१,रा. साईराम वाटिका बिल्डिंग, वनश्री अपार्टमेंट समोर, खडकपाडा. कल्याण(प) आणि जुगलकिशोर श्यामलाल मिश्रा, वय-३७, रा. नांदिवली, कल्याण (पु) यांचे समवेत कट रचून सदरचा गुन्हा तपासात निष्पन्न झाले. लगेच अत्यंत हुशारीने सापळा रचून आरोपी किरण पंडित याला ७ जून २०२० रोजी दुपारी ३.२२ वाजता व रात्री ९ .२१ वाजता इतर आरोपींना अटक केली. गुन्ह्याच्या तपासात अटक आरोपींकडून ३९,८५,०००/- रुपये रोख रक्कम व १ होंडा अॅक्टीवा, १ सुझुकी इंट्रोडर मोटर सायकल, १ ऑटो रिक्षा, ४ मोबाईल फोन असा एकूण ४२,७९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरील सर्व तपास मा. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मा. सहपोलीस आयुक्त सुरेशकुमार मेखला, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण दत्तात्रय कराळे, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३, कल्याण विवेक पानसरे, मा. सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महात्मा फुले पोलिस स्टेशन नारायण बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी जाधव, सपोनि. प्रकाश पाटील, सपोनि. दिपक सरोदे, पोहवा जयंवत शिंदे, विजय भालेराव, किरण शिर्के, संजय जगताप, पोना. भगवान भोईर, सुनील गांगुर्डे, जितेंद्र चौधरी, सुनील भणगे, मनोहर चित्ते, सचिन माने, शशिकांत निकाळे, संदिप भोईर, सचिन भालेराव, नरेश दळवी, पोशी. योगेश पवार, दिपक सानप, हनुमंत घुले यांनी सदरची कामगिरी केली.


No comments:
Post a Comment