साकेत मुक्तीसाठी बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने फुंकले रणशिंग!
"कोर्टाच्या कारवाईसह विशाल जनआंदोलनाची तयारी"
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) साकेत बचाओ, विरासत बचाओ’ आंदोलनाची घोषणा केल्यानंतर त्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. मूलनिवासी बहुजनांची विरासत वाचवण्यासाठी बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने रणशिंग फुंकले असून कोर्टाच्या कारवाईसह विशाल जनआंदोलनाची तयारी सुरू केली आहे. लॉकडाऊन समाप्त होताच ५५० जिल्हे, ४ हजार ५०० तहसील आणि ब्लॉक स्तरावर विशाल जनआंदोलन होईल. बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी प्रा.विलास खरात यांनी सांगितले की, साकेत (अयोध्या) बुध्द धम्माचे सर्वात मोठे केंद्र होेते. साकेत हे बुध्दस्थळ आरएसएसच्या ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक नष्ट केले.
"देशातील सर्व रेड झोनमध्ये ऑनलाईन निवेदन"
'५ ते ९ जून दरम्यान राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपतींना निवेदन'
५५० जिल्हे, ४ हजार ५०० तहसील आणि ब्लॉक स्तरावर आंदोलन ;
"बामसेफ, भारत मुक्ती मोर्चासहित हजारो संघटनांचे समर्थन"
दि. ११ मे २०२० रोजी जेसीबी चालवून २.७७ एकर या विवादित जागेवरील प्राचीन अवशेष तोडण्यात आले होते. परंतु अचानक चंपतराय यांनी २१ मे रोजी प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती देत एकतर्फी प्रचार केला. राममंदिराच्या बांधकामासाठी समतलीकरण करताना शिवलिंगाचे अवशेष मिळाल्याचे खोट्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित केल्या. परंतु त्याठिकाणी कमळाचे फूल, अष्टकोनी स्तूप, बुध्द प्रतिमा सापडल्या. ते सर्व बुध्दकालीन अवशेष असल्याचे प्रा. खरात म्हणाले.
"बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या साकेत मुक्ती आंदोलनाला सपोर्ट करणार"
ऐतिहासिक दृष्टीकोनातून पाहिले तर ब्राम्हणवादी लोक षड्यंत्रकारी व हिंसक आहेत. २००३ मध्ये रामलल्लाची मूर्ती ज्याठिकाणी स्थापित करण्यात आली होती ती जागा सोडून उत्खननाचे काम करण्यात आले. ही बाब पुरातत्व विभाग, आरएसएस आणि भाजपाला माहित आहे, तेथे रामाचा कुठलाही पुरावा नाही. त्यासाठी प्राचीन बौध्द स्तूप नष्ट करण्यासाठी त्यांनी लॉकडाऊनचा आधार घेतला. प्रा. खरात यांनी एएसआयच्या अहवालाचा हवाला देत सांगितले की, विवादित जागेमध्ये १८४ प्राचीन भग्नावशेष आहेत. त्यामध्ये बुध्द स्तूप व बुध्दकालीन अवशेष आहेत. ते जाणीवपूर्वक नष्ट करण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्राईम एएसआयच्या मदतीने करण्यात आला.
‘साकेत बचाओ, विरासत बचाओ’ या बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या आंदोलनाला बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चासहित सर्व ऑफशुट विंग संघटनांनी जोरदार समर्थन केले आहे. देशातील एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीच्या तमाम संघटनांना आवाहन करण्यात आले की, मूलनिवासी बहुजन समाजाची विरासत वाचवण्यासाठी या आंदोलनात सहकार्य करावे.
"भारतीय पुरातत्व विभागाला प्रा. विलास खरात यांचा इशारा"
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय पुरातत्व विभागाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अवशेष तोडण्याचे काम करण्यात आले हे मोठे क्राईम असल्याचे या नोटीसीत म्हटले आहे. भारतीय पुरातत्व विभागाने चंपत राय यांच्यावरही खटला दाखल करायला हवा असेही या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. चंपत राय यांच्यावर कारवाई करणार नसाल तर आम्ही भारतीय पुरातत्व विभागाचे कायदे सार्वजनिक स्तरावर जाळले जातील. त्याचबरोबर लॉकडाऊन समाप्त होताच विशाल जनआंदोलन केले जाईल असा इशारा प्रा. विलास खरात यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment