"युवती व महिलांवर होणा-या शारीरिक मानसिक अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी पदाधिका-यांनी समितीचा उपयोग करावा" "रविंद्रदादा जाधव"
धुळे : (अण्णा पंडित) दि.९ पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आजही दुय्यम स्थान मिळत आहे. सतीप्रथा, हुंडाबळी, बालविवाह यासारख्या अनेक अन्यायकारक चालीरीतींनी लाखो स्त्रियांचे अवघे आयुष्यच करपून टाकलेले असतांना छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतीराव फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ह्या राष्ट्रपुरुषांनी स्रियांवरील अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी केलेल्या कार्याचा व त्यांच्या विचारांचा आदर्श घेवून अन्याय अत्याचार निर्मुलन समिती ही महाराष्ट्रभर अन्यायग्रस्त व्यक्तींना कायदेशीर व सनदशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असून युवती व महिलांवर होणा-या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिका-यांनी अन्याय अत्याचार निर्मुलन समीतीचा उपयोग करावा असे प्रतिपादन समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष "मा.रविंद्रदादा जाधव" यांनी केले.
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, धूळे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने धनदायी नगर, गोंदुर रोड धुळे येथे सर्वसाधारण बैठक व पदग्रहण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. या प्रसंगी समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहणाचा सोहळा पार पाडण्यात आला. तसेच कोरोना व्हायरस महामारी च्या संचारबंदी व लाॅकडाऊन काळात ज्या पदाधिका-यांनी जीवाची पर्वा न करता समाजात जनजागृती केली. तसेच मास्क व सेनिटायझर व्यतिरिक्त गरीब गरजू व्यक्तींना मोफत अन्नधान्याचे वाटप केले अशा दहा पदाधिका-यांना *"कोविडथोध्दा"* सन्मानपत्र, शाल, गुलाबपुष्पे देवुन सन्माननीत करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या प्रदेश उपाध्यक्षा मा.प्रेमलताताई जाधव, वसंतराव वाघ, प्रदीप पगारे, प्रकाश गांगुर्डे, सुनिता सोनार, आदी. प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.
या वेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.
या वेळी प्रेमलताताई जाधव, सुनिता सोनार, कवीता कोळी, ललीता शिरसाट, राजेंद्र साळवे,अँड.जितेंद्र निळे, शोभा नगराळे, सारिका सूर्यवंशी, रोहीनी जगदेव, ललीता शिरसाट, या समाजधुरींना "कोविडयोध्दा" संन्मानपत्र शाल व गुलाबपुष्पे देवुन "मा.रविंद्रदादा जाधव" यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी धुळे जिल्हा अध्यक्षा म्हणून श्रीमती शोभाताई नगराळे यांची तर धुळे शहर अध्यक्षा म्हणून श्रीमती गायत्रीताई जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रेमलताताई जाधव, सुनिता सोनार, कवीता कोळी, शोभा बि-हाडे, गायत्री देवरे, ललीता शिरसाट, सुनिता शिरसाट, मीनाक्षी जगदेव, कविता सपकाळ, राजेंद्र साळवे, संजय बैसाणे, चंद्रकला मासुळे, रजनीताई ठाकुर, सारिका सूर्यवंशी, सोनार, आदींसह जिल्हा व शहर कार्यकारीणीच्या पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा नगराळे यांनी केले. शेवटी कविता कोळी यांनी उपस्थितांचे आभार मानुन राष्ट्रगितांने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*..योगेश गोसावी.*
प्रसिद्धी प्रमुख, नासिक जिल्हा, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य.



No comments:
Post a Comment