मुरबाडमध्येविविध सामाजिक उपक्रमातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २१ वा वर्धापनदिन साजरा! *मुरबाड शहर होणार हिरवंगार! कार्यकर्त्यांनी केला २१०० झाडे लावण्याचा अभिनव संकल्प *
मुरबाड { मंगल डोंगरे }"एक झाड लावू मित्रा,त्याला पाणी घालू ,मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू" या उक्तीप्रमाणे देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यावर्षीचा २१ वा वर्धापनदिन संपूर्ण देशात अत्यंत साध्या पध्दतीने साजरा होत असताना मुरबाड शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष कार्यकारिणी व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने मुरबाड शहर व परिसर हिरवंगार करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा करण्यात आला . महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुरबाड शहरात व परिसरात २१०० झाडे लावण्याचा अभिनव संकल्प केला व या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवातही केली. वर्धापनदिनानिमित्त तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी दिवस- रात्र झटणाऱ्या व जीवाची पर्वा न करणाऱ्या ग्रामीण रुग्णालय, मुरबाड येथील वैद्यकीय अधिकारी,परिचारिका,व रुग्णालयातील सर्व कर्मचारी या कोरोना योध्याना आर्सेनिक अल्बम- 30 या रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप केले.
२१ व्या वर्धापनदिनानिमित्त मुरबाड शहरातील काही गरीब- गरजू नागरिकांना किराणा साहित्याचे किट वाटप केले . तसेच मास्क व सॅनिटायझर चे ही वाटप करण्यात आले. लॉकडावूनच्या कालावधीत अनेक गरजू- गरीब आदिवासी भागातही भोजन व अन्नधान्य किट मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वाटप केल्याची माहिती शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे यांनी दिली. हा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी युवानेते सौरभ हिंदुराव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुरबाड शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे, मुरबाड तालुका सचिव मनीष हिंदुराव,शहर उपाध्यक्ष स्नेहल पाटील,सरचिटणीस अशिष तेलवणे,चिटणीस अभिषेक डुंकवाल ,जेष्ठ नेते पुंडलिक हरणे,युवक उपाध्यक्ष कुणाल पुरोहित, सेवादल सेलचे मुरबाड शहर अध्यक्ष शिवाजी नवले,युवा कार्यकर्ते ललित हिंदुराव, ओंकार रोठे,अक्षय वाघचौडे आदी कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण तालुका राष्ट्रवादीमय करण्यासाठी भविष्यात कार्यकर्ता नोंदणी अभियान ,गाव तेथे विकास, गाव तेथे शाखा,अभिनव सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे व मुरबाडकरांच्या समस्यांना वाचा फोडणार असल्याचे शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment